कोमसाप नवीन पनवेल शाखेच्यावतीने ऑनलाइन कविसंमेलन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभेच्छा
कविसंमेलने जगण्याला उभारी देतात - कवी अरुण म्हात्रे
पनवेल (प्रतिनिधी): कविसंमेलने जगण्याला उभारी देतात असे मत सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा आयोजित ऑनलाइन कविसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
यापुढे बोलताना अरुण म्हात्रे यांनी, कोकण मराठी साहित्य परिषद ही केवळ साहित्य संस्था नसून हृदय बांधणारी संस्था आहे .लॉकडाऊच्या काळात सगळ्या जगाने भयानक अनुभव अनुभवले आहेत .लाॅकडाऊनमधून आपण लवकरच बाहेर येऊ असे त्यांनी सांगितले
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, कोमसाप नवीन पनवेल शाखा दर वर्षी वेगवेगळे उपक्रम राबवित असते. या कविसंमेलनात अनेक विविध विषयांवर कविता सादर करून कवी हे संमेलनात रंगत आणतील अशा शुभेच्छा दिल्या.
कोमसापचे नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी, संकट काळात कविता बळ देते, ताकत देते त्यामुळे जगण्याला उर्जितावस्था येते. कवींच्या उत्साह निर्माण करणाऱ्या कविता आलेली संकटे विसरून जायला शिकवतात असे सांगितले.
या कविसंमेलनात प्राध्यापक चंद्रकांत मढवी, गझलकार ज्योत्स्ना राजपूत, कवी प्रकाश पाटील, रामदास गायधने यांनी सहभाग घेतला. आक्रोश, वगैरे -वगैरे, महापुरुषांनो पुतळे फोडून बाहेर या, जगाचा पोशिंदा या कविता सादर केल्या.
या कविसंमेलनाला कोमसापचे जनसंपर्कप्रमुख रायगड भूषण एल.बी. पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. आभार स्मिता गांधी यांनी मानले तर उत्कृष्ट सूत्रसंचालन योगीनी वैदू यांनी केले.
Comments
Post a Comment