म्हसळा तालुक्यात आणखी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, कोरोना बाधितांची संख्या 06 वर, तर दोघांचा मृत्यू
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या आता वाढत असून मुंबई तुन आलेल्या काही चाकरमणी यांना कोरोणाची लागण झाली असल्याचे निष्पन्न होत आहे. तालुक्यातील दुर्गवाडी, पाभरे, गायरोने, तळवडे या गावातून प्रत्येकी एक कोरोना बाधित रुग्ण आढळले असून यांपैकी दुर्गवाडी गावातील एका इसमाचा याअगोदर मृत्यू झाला आहे. आज बुधवारी संध्याकाळी मिळालेल्या माहितीनुसार आणखी दोन जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.
वारळ गावातील एका 60 वर्षीय महिलेचा काही दिवसांपूर्वी कोरोना बाधित संशयास्पद मृत्यू झाला होता. या महिलेचा आज बुधवारी संध्याकाळी कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली. तर मुंबईतील कांदिवली विभागातून कणघर गावात आलेल्या एक 62 वर्षीय मुंबईकर चाकरमणी याचा देखील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गणेश कांबळे यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment