शासनाच्या योजनांपासुन वंचित राहिलेल्यांना प्रशासनाने अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी… - आ. अनिकेतभाई तटकरे यांची शासन व प्रशासनाला विनंती…
रायगड : (प्रतिनिधी)
सामाजिक जाणिवा जागृत असलेले कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्यतत्पर आमदार अनिकेतभाई तटकरे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अडचणीत असलेल्या लोकांना सातत्याने मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करत असुन आजपर्यंत त्यांच्या माध्यमातून अनेक नागरिकांना मदत मिळाली आहे. ज्या लोकांकडे शिधापत्रिका नाही अशा शासनाच्या योजनांपासुन वंचित राहिलेल्या लोकांसाठी शासन व प्रशासनाने अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी अशी विनंती आ. अनिकेतभाई तटकरे यांनी रायगडच्या पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे, जिल्हाधिकारी निधि चौधरी यांना केली आहे.
गेला महिनाभर सामर्थ्याने, जिद्दीने करोनाच्या संकटाला सर्वजण तोंड देत आहेत विशेषत: मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांनी धैर्याने, सबुरीने प्रशासनाला सहकार्य केले आहे त्यांच्या संयमाचे व धैर्याचे आ.अनिकेतभाई तटकरे यांनी विशेष कौतुक केले असुन त्यांच्यापैकी अनेक जणांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने बऱ्याच जणांकडे आर्थिक संकट ओढावले असल्याची बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे . रेशनकार्ड जवळ नसलेल्या, शासनाच्या योजनांपासून वंचित राहिलेल्या चाकरमानी व कामगार नागरिकांना आपण पाच किलो तांदूळ, तीन किलो गहू व इतर कडधान्य तसेच गरजेच्या गोष्टी उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती त्यांनी केली आहे. जिल्हा नियोजनामार्फत किंवा इतर माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊन आपण ही मदत गरजवंतांपर्यंत पोहोचवलीत, तर निश्चितच फायदेशीर ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
रायगडचे लोकमत 'रायगड मत'
संपादक :- जितेंद्र नटे ✍️
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा :-
📲 8652654519
📲 9137595224
Email : raigadmat@gmail.com
🌍 Website : raigadmat.page
🎤 News Channel - News81रायगड मत
https://www.youtube.com/channel/UCLPo_3uBeBf7J7JAxssbZlg।
Comments
Post a Comment