पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगाना  महानगरपालिकेमार्फत धान्य-जेवणाचे पाकिट पुरवा  - सभागृहनेते परेश ठाकूर यांची मागणी  

 

 

 

 

 

 

पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगाना महानगरपालिकेमार्फत धान्य-जेवणाचे पाकिट पुरविण्यात यावेत, अशी मागणी महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. 

           या संदर्भात त्यांनी लेखी निवेदनही दिले असून यावेळी भाजपचे शहर सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत उपस्थित होते. 

        सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, सध्या देशभर सर्वत्र कोरोना (कोविड-१९) या विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असून, सदरील विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये या करिता केंद्र व राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सातत्याने स्वच्छतेचे आवाहन केले जात असुन, सध्या कोरोना विषाणूच्या फैलावावर नियंत्रण आणणे करीता संपूर्ण देशभरात वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे. ३ मे २०२० पर्यंत 'India Lockdown' च्या ह्या काळात हातावर पोट घेऊन जगणाऱ्यासाठी व कुटुंबापासून दूर राहणाऱ्या वर्गासाठी हा अत्यंत खडतर असा काळ आहे. कामधंदा बंद असल्यामुळे व हॉटेल् आणि खानावळ बंद असल्यामुळे त्यांनी कसे जगावे असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे. तसेच पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना बाधित रुग्णांची ४० हून अधिक वाढ असल्याने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांगाना अन्ना वाचुन वंचित राहून नये व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची उपासमारीची वेळ येऊ नये, याकरीता पनवेल महानगरपालिकेमार्फत धान्य-जेवणाचे पाकिट पुरविण्यात येणे गरजेचे असून या विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग बांधवाकरीता पनवेल महानगरपालिकेमार्फत धान्य / जेवणाचे पाकिट पुरविण्यात यावेत, अशी आग्रही मागणी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केली आहे

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर