लॉक डाउन मध्ये  दररोज हजारो गरजू लोकांना जेवण वाटप... एक हात मदतीचा..गरिबांना दिलासा 


 


 



 

पनवेल(प्रतिनिधी) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने दररोज हजारो लोकांना जेवण पुरविले जात असून या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

          कोरोना विषाणू प्रादुर्भाव आणि त्यामुळे आलेल्या लॉक डाऊन परिस्थितीमुळे मोलमजुरी करणाऱ्या नागरिकाला आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्यातून आणि मार्गदर्शनातून पनवेल परिसरातील १८ हजारहून अधिक कुटूंबांना अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. 

          त्याचप्रमाणे लॉक डाऊन वाढल्यानंतर हातावर पोट असलेल्या, मोलमजूर तसेच बेघर लोक अन्नापासून वंचित राहू नयेत, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भाजपच्यावतीने 'मोदी भोजन  कम्युनिटी किचन' च्या माध्यमातून खारघर, पनवेल, तक्का, कामोठे येथे दररोज किमान अडीच हजार लोकांना तयार जेवण पुरविले जात आहे. हे अन्न फॉईल कंटेनरमध्ये पॅक करून आणि सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करून वाटप केले जात आहे. त्यामुळे गरीब गरजू लोकांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार प्रशांत ठाकूर व महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर हे या उपक्रमात जातीने लक्ष घालत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहकार्य देत आहेत. 


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर