श्रीवर्धन मध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला...!!

 


 


 



श्रीवर्धन(सावन तवसाळकर):- श्रीवर्धन मध्ये एका रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे .प्राप्त माहिती  संबधित व्यक्ती  ०४ एप्रिल ला श्रीवर्धन मध्ये आली असता त्यास कोरोनांची प्राथमिक लक्षणे दिसण्यास सुरुवात झाली .त्या नंतर संबधित व्यक्तीला श्रीवर्धन सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले .त्या नंतर पुढील चाचणी साठी त्यास पनवेल येथील   एम जी एम रुग्णालयात वर्ग करण्यात आले .संबधित व्यक्तीचा कोरोना चाचणी चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे .त्या नंतर तालुका प्रशासनाने संबधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना कोरोना चाचणी साठी पाठवले असल्याचे समजते .राज्य सरकारने सर्वत्र लॉक डाऊन करून सुद्धा वरळी येथील व्यक्ती श्रीवर्धन मध्ये कसा पोहचला या विषयी प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे .कारण संबधित व्यक्ती श्रीवर्धन मध्ये आल्या नंतर त्यांनी विविध ठिकाणी मुक्त संचार केल्याची शक्यता नाकारता येत नाही .आता श्रीवर्धन तालुका प्रशासना समोर कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान आहे .कारण सर्वत्र लॉक डाऊन असून सुद्धा नागरिक लॉक डाऊन ला गांभीर्याने घेत नाहीत .रुग्ण आढलेल्या विभागाच्या ०३ किमी पर्यंत चा परिसर काही काळासाठी बंदिस्त करण्याची शक्यता नाकारता येत नाही . श्रीवर्धन शहरातील किराणा दुकान व भाजीपाला विक्रेते यांनी या पूर्वीच दुपारी एकच्या नंतर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे .मात्र सकाळी सर्वत्र गर्दी आढळून येते .नगरपालिकेने आखणी करून दिलेल्या चौकोनात कुणीच सुरक्षित अंतर ठेवून उभे राहत नाही .तसेच दुकान दार सुद्धा त्या कडे दुर्लक्ष करतात .आगामी काळात श्रीवर्धन मधील  लोकांना कोरोना ला गांभीर्याने घेण्याची गरज आहे  .अन्यथा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही .


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर