रमजानच्या पवित्र महिन्यात मस्जिद मध्ये अजान देण्याची परवानगी मिळावी यासाठी महाराष्ट्रीयन मुस्लिम हक्क समितीची मुख्यमंत्र्यांकडे ईमेल द्वारे मागणी
प्रतिनिधी:- रमजानच्या पवित्र महिन्यात मस्जिद मध्ये अजान देण्याची परवानगी मिळावी यासाठी महाराष्ट्रीयन मुस्लिम हक्क समितीने मुख्यमंत्र्यांकडे ईमेल द्वारे मागणी केली आहे.दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दिनांक 25/04/2020 पासून मुस्लिम धर्मियांचा रमजानचा पवित्र महिना सुरू होत आहे.रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव अजाननुसार सहेरी,इफ्तार व तराविह नामजाचे पठण करतात.परंतु भारत सरकारच्या प्रार्थनास्थळ बंद ठेवण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो व आदर करतो पण मुस्लिम धर्मात रमजान या पवित्र महिन्याचे अनन्यसाधारण महत्व आहे.त्यामुळे रमजानच्या पवित्र महिन्यात मस्जिद मध्ये अजान देण्याची मुभा लॉकडाउन काळात देण्यात यावी.त्यामुळे रमजानच्या काळात मुस्लिम बांधवाना धार्मिक कार्यासाठी मदत होईल.अशी मागणी महाराष्ट्रीयन मुस्लिम हक्क समितीने मुख्यमंत्र्यांकडे ईमेल द्वारे पत्र पाठवून केली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी,सचिव अफ्रोज सय्यद यांनी दिली.
Comments
Post a Comment