दिघी सागरी बोर्ली पंचतन पोलीसांची अवैध दारू धंद्यावर धडक कारवाई
सर्फराज दर्जी-बोर्ली पंचतन
सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून सरकारने संचारबंदी व लाॅकडाऊनचे आदेश आहेत आणि सर्व प्रकारचे देशी विदेशी दारु दुकाने व बिअर बार बंद असल्याने आणि मोठ्या प्रमाणात नागरीक मुंबई व उपनगरातून आले आहेत, त्यामुळे गावठी हातभट्टी दारुचे अड्डे विविध गावात काही ठिकाणी चालू असल्याचे समजते. *दिघी सागरी पोलीस* ठाण्याच्या हद्दीत दिनांक २१/०४/२०२० रोजी दुपारी ३ च्या सुमारास वडवली ते दिवेआगर जाणा-या अंतर्गत रस्त्यावर *एम.एच.०१.जी.ए.७५९३* या नंबर च्या सँट्रो कार मध्ये गावठी दारूची वाहतुक होत असल्याचे दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक *महेंद्र शेलार* यांना समजले , माहिती मिळताच पोलिस सहाय्यक निरीक्षक *महेंद्र शेलार* ताबडतोब *पोलीस नाईक संदिप चव्हाण ,पोलीस हवालदार शेडगे, जागडे, प्रकाश सुर्वे* यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेऊन वडवली ते दिवेआगर जाणा-या अंतर्गत रस्त्यावर *विजय विनायक वाणी(वय४५) व जगदिश केशव शिरवटकर* नावांचे दोन माणसे कोणत्याही प्रकारचा शासनाचा परवाना नसताना ते *एम.एच.०१.जी.ए.७५९३* सँट्रो कार मध्ये गावठी दारूची वाहतुक करत असल्याचे दिघी सागरी पोलीसांच्या निर्देशास आलं. पोलीसांनी ताबडतोब ३०७५/- रुपये किमतीची गावठी हातभट्टीची तयार दारू व ३०,०००/- रुपये किमतीचा माल, एकूण ३३०७५/- रुपये किमतीची माल हस्तगत केला व गुन्ह्यातील आरोपींना सायंकाळी ७ वाजता च्या सुमारास दिघी सागरी पोलीस ठाणे येथे गुरनं १८/२०२० दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ अ, ६५ खंड ई, भा.द.वि.स.कलम ३४ प्रमाणे *विजय विनायक वाणी(वय४५) व जगदिश केशव शिरवटकर* या दोन आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक *संदिप चव्हाण* करीत आहेत.
सध्याच्या अशा कडेकोट बंदोबस्तात व्यस्त ड्युटीमध्ये सुध्दा या कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सर्वत्र दिघी सागरी पोलीस ठाण्याचे कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment