रायगड जिल्ह्यातील पोलादपूर शहरात कोरोनाची पहिली रुग्ण निष्पन्न
प्रतिनिधी : पोलादपूर शहरातील प्रभातनगर पश्चिम या लोकवस्तीमध्ये असलेल्या एका वृध्द जोडप्यापैकी महिलेला तीन दिवसांपूर्वी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये हलविण्यात आल्यानंतर कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली.
पोलादपूर शहरातील प्रभातनगर पश्चिम हा परिसर तातडीने सील करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली आहे.
पोलादपूरच्या तहसीलदार दिप्ती देसाई यांच्यावतीने त्यांचे पती आणि पोलीस सील करण्यात आलेल्या प्रभातनगर परिसरामध्ये तळ ठोकून बसलेले दिसले. पोलादपूर पोलिसांनी श्रीकाळभैरवनाथ देवस्थान परिसरांमध्ये सावलीत तळ ठोकलेला दिसून आला.
पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये चौकशी केली असता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गुलाबराव सोनवणे यांनी सदर महिला कस्तुरबा रुग्णालयात दाखल होण्यासाठी महाड शहरातील खाजगी रुग्णालयांमधून रवाना झाली तेथे तिच्या मुलाने भांडूप मुंबई येथील निवास स्थानाचा पत्ता दिल्याने पोलादपूरमधून रवाना झालेल्या महिलेबाबत अधिक माहिती मिळण्यात रायगड जिल्हा प्रशासनाला अडचण निर्माण झाली.
पोलादपूर तालुक्यात त्यांच्यावर बंदी काळामध्ये 9140 चाकरमानी विविध गावांमध्ये दाखल झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही संख्या लॉक डाऊन चा कालावधी दुसऱ्यांदा वाढल्यानंतर वेगाने वाढ झाली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पोलादपूर तालुका प्रशासनाने राज्याच्या अन्य भागातून येथे दाखल झालेल्या चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारे होम अंडर क्वारंटाईन चे शिक्के मारण्याची माहिती अधिकृतपणे प्राप्त झालेली नाही.
पोलादपूरमधील सदर महिला बुधवारी महाड येथील डॉ. महामुणकर यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर तेथून तिला सरकारी ऍम्ब्युलन्सने कस्तुरबा रुग्णालयामध्ये तिच्या मुलासोबत नेण्यात आले. तेथे तिची कोरोना टेस्ट झाल्यानंतर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला असल्याचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी सांगितले.
Comments
Post a Comment