रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना शासनाच्या माध्यमातून अन्नधान्य द्या  - आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी 


 

 

 

 

पनवेल(प्रतिनिधी) रायगड जिल्हयातील व विशेषतत्वाने पनवेल तालुक्यातील रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना शासनाच्या माध्यमातून अन्नधान्याची तातडीने मदत मिळावी, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

या संदर्भातील निवेदन त्यांनी पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनाही दिले आहे. यावेळी महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत उपस्थित होते. 

        आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल तालुक्यातील निरनिराळया विकामकामांच्या निमित्ताने तसेच उद्योगधंद्यांच्या निमित्ताने देशातील निरनिराळया राज्यातून व महाराष्ट्राच्या निरनिराळया भागातून अनेक लोक गामीण व शहरी भागात रहात आहेत. कोरोना महामारीच्या संकटामुळे आणि लॉकडाऊनमुळे या सर्वांचा रोजगार बंद झाला आहे. शासकीय अधिकार्यांकडून प्राप्त माहितीनुसार ही संख्या १ लाख ५० हजारच्या आसपास आहे. 

         लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे या सर्व लोकांची उपासमार होत आहे. राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, शासनाची मदत यानंतरही कुटुंबासहित राहणाऱ्या लोकांना रोज जेवण मिळेलच याची शाश्वती नाही. सार्वजनिक वहातूक व्यवस्था नसल्याने तसेच पोलीसांकडून जमाव पांगवण्याच्या विविध प्रयत्नांमुळे अनेकांना उपासमारीस सामोरे जावे लागते.

महाराष्ट्र शासनाने मे व जून महिन्यात धान्य देण्याचे जाहीर केले असले तरी ज्यांच्याकडे स्थानिक रेशनकार्डच नाही अशा या सुमारे दिड लाख लोकांना शासनाकडून तातडीने  अन्न-धान्याचीच मदत होणे अपेक्षीत आहे. म्हणून शासनाच्या आकस्मित निधीतून खर्च करून स्वस्त धान्य दुकानामार्फत सदर लोकांना विशेष बाब म्हणून तांदूळ, डाळ, तेल यासारख्या अन्नधान्याच्या वस्तू पुरवल्या जाव्यात, व त्याची तातडीने कार्यवाही व्हावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर