कोरोना व लॉक डाऊनच्या पार्श्र्वभूमीवर यापुढेही जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या - आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर जनतेने एक दिलाने शासनाला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.तशा प्रकारचे सहकार्य सध्या सुरु असलेल्या लाँकडाउनच्या काळात ही करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदार संघासह रायगडच्या जनतेला केले आहे.
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आपल्या देशातही कोरोनाला हरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरु आहे. देशात, राज्यात आणि आपल्या पनवेल व आजूबाजूच्या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे यासाठी गर्दीच्या जागी जाणे टाळा, मास्क, सेनिटायझर वापरा, हात वारंवार साबणाने धुवा, स्वच्छता राखा असे सांगून शासनाला सहकार्य करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा केले आहे.
पोलीस यंत्रणा, शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी आपली ड्युटी लाँकडाउनच्या काळातही अविरत सुरू ठेवली आहे. तसेच तालुक्यातील भाजप तसेच इतरही विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते, सामाजिक संस्था, पत्रकार यांनी आदिवासी,भटक्या नागरीकांना आणि परिसरातील मोल मंजुरी करणाऱ्या कामगारांना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे आणि मास्क,सनिटायझर,सह इतर मेडिकल साहित्याचे वाटप करीत आहे. त्यांचे मी आभार मानत आहे, असाही उल्लेख आमदार प्रशांत ठाकूर यांनी आवर्जून केला आहे.
Comments
Post a Comment