चिंचपाडा येथील भराव काढल्याने पनवेल शहराला पुराचा धोका कमी



पनवेल (प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे चिंचपाडा येथील गाढी नदीच्या पूलाखालील  भराव काढण्यात आल्याने या वर्षी पनवेल शहरात पावसाळ्यात पुराचे पाणी शिरण्याचा धोका कमी झाली असल्याची माहिती माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांनी दिली.  
             पनवेल शहरात मागील वर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसात  गाढी नदीचे पाणी पनवेल शहरातील साई नगर ,बावन्न बंगला ( दि .बा. पाटील नगर ) , पटेल मोहल्ला खाडी,वीट सेंटर ,कोळीवाडा भागात 5-8 फुट पाणी साचले होते. त्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. चिंचपाडा भागात गाढी नदीवरील पूलाखाली मातीचा भराव असल्याने पनवेल शहरात मोठ्या प्रमाणात पाणी येऊन पुर सदृश्य स्थिति निर्माण झाल्याचे लक्षात आले होते.
              या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही परिस्थिति शासनाच्या लक्षात आणून दिली होती. कोरोंनाच्या लॉक डाऊन काळात शहरात आणि महामार्गावर रस्त्याची आणि पावसाळ्यापूर्वीची कामे सध्या जोरात सुरू आहेत. आमदारांनी सदर पुलाचे ठेकेदार अशोका बिल्डकोंनचे एम.आर. पाटील यांना याबाबत सांगून तो भराव काढायला सांगितला असता त्यांनी गाढी नदीच्या पूलाखालील भराव नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यास सुरुवात केली आहे. 

 


रायगडचे लोकमत 'रायगड मत' 
संपादक :- जितेंद्र नटे ✍️


बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा :-
📲 8652654519
📲 9137595224


Email : raigadmat@gmail.com 
🌍 Website : raigadmat.page 


🎤 News Channel - News81रायगड मत 


https://www.youtube.com/channel/UCLPo_3uBeBf7J7JAxssbZlg



 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर