श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भाजपच्यावतीने महापालिका क्षेत्रात अन्नछत्र
पनवेल(प्रतिनिधी) कोरोना व्हायरस आणि त्यामुळे असलेल्या लॉक डाऊन परिस्थितीत गरीब गरजू नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी दानशूर नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भाजपच्यावतीने खारघर, कामोठे, पनवेल या ठिकाणी मोफत अन्नछत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.
आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी या अन्नछत्राला भेट देऊन गरजूंना जेवण वाटप केले. पनवेल महापालिका क्षेत्रात भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी कम्युनिटी किचन सुरु करण्यात आले असून याबद्दल भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निस्वार्थीपणे केल्या जाणाऱ्या या कामाचे कौतुक केले तसेच अन्नछत्राला जागा देणाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत. लॉक डाऊन संपेपर्यंत हे अन्नछत्र सुरु राहणार असून गरजूंनी निसंकोचपणे याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर व सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले आहे.
या अन्नछत्राच्या माध्यमातून अन्न फॉईल कंटेनरमध्ये पॅक करून आणि सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करून वाटप केले जात आहे. पनवेलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील मुणोथ इंप्रेस सोसायटी, खारघरमध्ये शिवमंदिर, कामोठे येथे सुषमा पाटील विदयालय येथे सुरु करण्यात आलेले अन्नछत्र लॉक डाऊन संपेपर्यंत सुरु राहणार आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपून लवकरच लॉक डाऊन परिस्थिती संपावी.या रोगाच्या लाटून मुक्तता मिळावी यासाठी प्रशासन काम करत आहे. लॉकडाउनच्या या परिस्थितीत हॉटेल आणि खाणावळही बंद आहे, त्यामुळे बेघर, मजूर, हातावर पोट असणाऱ्या नागरिकांनी उपाशी राहू नये यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते जीवनावश्यक वस्तू, अन्नछत्र, व इतर मदत करत आहेत. त्यामुळे नागरिकांकडूनही या उपक्रमाचे कौतुक आणि आभार व्यक्त केले जात आहेत.
रायगडचे लोकमत 'रायगड मत'
संपादक :- जितेंद्र नटे ✍️
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा :-
📲 8652654519
📲 9137595224
Email : raigadmat@gmail.com
🌍 Website : raigadmat.page
🎤 News Channel - News81रायगड मत
https://www.youtube.com/channel/UCLPo_3uBeBf7J7JAxssbZlg
Comments
Post a Comment