फोटोग्राफरचे आयुष्यच लॉक डाऊनच्या मार्गावर आहे : जिल्हाध्यक्ष विवेक सुभेकर यांची खंत


 


 


 


श्रीवर्धन,२१ एप्रिल ( राजू रिकामे ) :


कोरोना विषाणूमुळे संपुर्ण जगाची अवस्था बिकट झाली आहे. लॉक डाऊन हा एकच पर्याय असल्याने भारतातील सर्व व्यवसाय ठप्प झालेत. यामुळे फोटोग्राफी सह त्यावर अवलंबुन असणारे पुरक व्यवसाय पुर्णतः कोलमडला आहेत. फोटोग्राफी व्यवसायाच्या वाईट दिवसांना सुरुवात झाली असुन आगामी काळात फोटोग्राफरचे आयुष्य पुर्णतः लॉक डाऊनच्या मार्गावर आहे. यामधे आत्तापर्यंत सरकारकडून कोणते व्यवसाय चालू व कोणते नाही हे सांगतांना त्यामधे फोटोग्राफी हया व्यवसायाचा कुठेही उल्लेख नाही ही खंत रायगड जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन चे अध्यक्ष विवेक सुभेकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
याबाबत अधिक स्पष्टीकरण देताना विवेक सुभेकर म्हणाले की, दहा वर्षापुर्वी प्रत्येक कार्यक्रमास फोटोग्राफरची आवश्यकता असायची. त्यामुळे यामध्ये पैसा व प्रसिद्धी होती. त्यामुळे अनेक तरुण या व्यवसायात उतरले. रायगड जिल्ह्यात जवळपास दिड हजारावर छोटेमोठे फोटोग्राफर आपली उपजिवीका करीत आहेत. परंतू मोबाईल जमाना आला अन् फोटोग्राफर हळूहळू पडदयामागे जावू लागलाय. मोबाईलला चांगल्या दर्जाचा कॅमेरा आल्याने व विवीध अॅप यामुळे फोटो व शुटींग प्रत्येकाच्या हातात आले आणि प्रत्येक जण फोटोग्राफर झाला. त्यामुळे फोटोग्राफी व्यवसाय धोक्यात आला, व्यवसाय पुर्णतः मंदावला.
लग्नसराई पुरताच फोटोग्राफरला काम राहीले. स्टुडीओ मध्ये पासपोर्ट फोटोग्राफी शिल्लक असताना सरकारी नियमाप्रमाणे बँकामधे नेट बँकीग वेब कॅमेराने ऑनलाईन फॉर्म सबमिशन सुरु झाले तर मात्र फोटोग्राफर पुर्णतः कोलमडून जाईल. याकडेही सरकारने लक्ष देवून संपूर्ण देशभरातील काही लाखांच्यावर असणारी फोटोग्राफर ही जमात काळाबरोबर नामषेश होईल यासाठी विचार करावा. त्यामधे अजुन आलेले हे लॉकडाऊनमुळे संपुर्ण लग्नसिझनच रद्द झाला व फोटोग्राफर पुर्णत: हतबल झाला. या सिझनसाठी त्याने आपल्या हातातील असलेला पैसा गुंतवला. या चार महिन्याच्या मोसमात तो संपुर्ण वर्षभराचे नियोजन करतो.
या मोसमात काहीतरी चांगले होईल यासाठी काहींनी कर्ज काढले, हात उसने पैसे घेतले व हा मोसम चांगला जावा. कोणतीही अडचण येवू यासाठी नवीन कॅमेरा, इतर साहित्य खरेदी केले. परंतू आज ही लग्नसराई पुर्णतः रद्द झाल्याने व घेतलेला अॅडव्हांस परत करावा लागल्याने फोटोग्राफरचे संपुर्ण नियोजन कोलमडले. दररोजचा कौटूंबिक खर्च, मुलांचे शिक्षण, घरभाडे, दुकानाचे भाडे, भरमसाठ येणारे लाईट बिल अशा चहूबाजुने आलेल्या संकटात तो सापडलाय. केवळ लग्नाच्या या मोसमवर अवलंबुन असलेला फोटोग्राफर काळाआड जाईल की काय ही भिती जिल्हाध्यक्ष विवेक सुभेकर यांनी बोलून दाखविली.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर