आमदार मनोहर भोईर यांच्याकडून १२००० च्यावर आदिवासी, निराधार गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, वाटपाचे काम सुरूच पुनाडे ग्रामपंचायत हद्दीतील ९० कुटुंबांनी घेतला लाभ
कळंबोली/ प्रतिनिधी
पनवेल प्रतिनिधी कोरोना संक्रमण होऊ नये म्हणून गेल्या २४ पासून लॉकडाऊन सुरू आहे. 3 मे नंतरही ही परिस्थिती किती बदलेल याबाबत शंका आहे परिणामी हातावर पोट असलेल्या अनेकांवर उपासमारीची वेळ येण्यास सुरुवात झाली आहे. त्यात पनवेल उरण तालुक्यात आदिवासी बांधवां बरोबर निराधार , झोपडपट्टीवासी , गरीब गरजू यांचे प्रमाण जास्त आहे हातावर पोट भरणा-या आदिवासी बांधवाना एक वेळचे जेवण मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यांच्या हाताला काम नसल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता पर्यत असा १२००० च्यावर आदिवासी गरीब निराधार नागरिकांना राज्याचे मुख्यमंत्री मा. आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले व करण्यात येत आहे. त्याच्या या स्तुत्य उपक्रमाने त्यांच्यावर सर्व समाजातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
कोरोना या महामारी रोगाने थैमान घातले आहे. त्या विषाणूंचे संक्रमण होऊ नये म्हणून देशभरात लॉक डाऊन सुरू आहे. ही मुदत शासनाने आणखी 3 मे पर्यंत वाढवली आहे. शासन व प्रशासनाच्चा आदेशाचे पालन करताना प्रत्येकांनी आपल्याला सुरक्षित म्हणून घरात बंद करून घेतले आहे दरम्यान त्यामुळे सर्व कामे ठप्प झाली आहेत. व्यवसायिक, कारखानदार, चाकरमानी, वाहतूकदार यांच्या व्यवसायाला पुर्णपणे खील बसली आहे. दुर्गम भागातील आदिवासी बांधव व झोपडपट्टीवासी असा हातावर पोट असल्याना एक वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागत आहे. घरातील अन्नधान्य व पदरमोड केलेला पैसा संपल्याने त्याच्यावर उपासमारीची पाळी आली आहे रोज मजूरी करायची आणि त्यावर आपला गुजारा करायचा असा लोकांना पोटाची खळगी कसी भरायची गा मोठा प्रश्न आहे . पण माझ्या राज्यातील एकही माणुस उपासी राहता कामा नये या आवाहनाला खडे उतरत निराधार , आदिवासी बांधवांसाठी मा आमदार तथा रायगड जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांनी मदतीचा हात पुढे केला आहे
पनवेल उरण तालुक्यातील वासबे जि, प विभागातील ७५० आदिवासी , वडगाव पंचायत समिती मधील १२८०, चौक पंचायत समिती २४००, चिरनेर जिल्हा परिषद गटामधील ५३५, जासई जिल्हा परिषद गटातील १०५५ , चाणजे जि. प.संघात ३७८, नवघर जिल्हा परिषद मतदार संघाताल ५२५, उरण शहर झोपडपट्टीतील ९८०, केळवणे जिलेहा परिषद मधील १५३०, गिळसुंदे जि प मतदार संघातील ६५०, वजघर जिल्हा परिषद ७८६, गव्हाण जिल्हा गटातील १७८, पळस्पे पंचायत समिती मधीील ३२४ असा एकून ११३७१ आदिवासी, निराधार गरीब गरजूना अन्नधान्याचे वाटप मा. आमगार मनोहर भोईर यांच्या वतीने करण्यात आले व दररोज करण्यात येत आहेत.
कोरोनाच्या महामारीत रुग़्णाना मदत म्हणून मा. आमदार तथा रायगड जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांनी २९ रक्तदान शिबीर व सँनेटाझर व मास्कचे वाटप करण्यात येणार आहे .पुनाडे येथील आदिवासी, गोरगरीब, निराधार नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. त्यावेळी घनश्याम पाटील, दिलाप पाटील , राजेश पाटील , अपुर्व पाटील, चंद्रकात पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
रायगडचे लोकमत 'रायगड मत'
संपादक :- जितेंद्र नटे ✍️
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा :-
📲 8652654519
📲 9137595224
Email : raigadmat@gmail.com
🌍 Website : raigadmat.page
🎤 News Channel - News81रायगड मत
https://www.youtube.com/channel/UCLPo_3uBeBf7J7JAxssbZlg
Comments
Post a Comment