कोरोना चा पार्श्वभूमीवर, मुंबई दुरदर्शन केन्द्रा मध्ये हंगामी कर्मचार्यांचे वेतन मिळणे बाबद अतिरिक्त अधिकारी यांच्याकडे केली मागणी
मुंबई वरळी (महेश कदम प्रतिनिधी) - गेले काही दिवस कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन असलेल्या संपूर्ण भारतात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एवढा मोठा कोरोनाचा संकट अख्ख्या जगात पसरला असताना आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धव ठाकरे साहेब वारंवार जनतेच्या सुरक्षिततेसाठी घरात राहण्याचे आव्हान करीत आहेत.
शासनाचे पालन करा, लोकांना त्यांचे वेतन दिले जाईल.
परंतु अशा परिस्थिती मध्ये ही
दूरदर्शन चे अधिकाऱ्यांनी जे कामावार आले अाहेत त्यांना वेतन देऊ आणि जे अशा परिस्थिती येऊ शकले नाहीत त्यांचा वेतन न देण्याची भूमिका करत आहेत
१५० कर्मचार्यांपैकी ५०% हंगामी कर्मचारी हे वरळी विभागात राहतात जो विभाग पालिकेने रेड झोन म्हणून घोषित केले आहे आणि काही भाग सील करण्यात आले होते, असे असतानाही वेतन न मिळण्याच्या भीतीने ज्यांना शक्य होते ते कर्मचारी ऑफिस चे काम थांबू नये म्हणून कामावर जात होते.
हंगामी कर्मचाऱ्यांना कोणतीही वैद्यकीय सेवा नसताना १५,००० वेतनासाठी जीवाला धोका पत्करत कामावर जात होते.
परंतु जे ट्रेन व बस ने प्रवास करतात, ज्यांचे विभाग पालिकेने सील केले आहेत असे कर्मचारी कामावर जाऊच शकत नव्हते.
अशा परिस्थिती मध्ये दूरदर्शन च्या अधिकाऱ्यांकडून सहकार्य अपेक्षित होते परंतु असे न होता हंगामी कर्मचाऱ्यांना वेतन न मिळण्याच्या सांगण्यात येत आहेत.
१५०००/- मासिक वेतन असलेला कर्मचारी त्याचं घर कसा चालवू शकेल, त्याच्या लहान मुलांना आणि वयोवृद्ध आई वडिलांना कसा सांभाळू शकेल असा प्रश्न १५० हंगामी कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी लोकांना दूरदर्शन द्वारे सांगत आहेत तरी ही दूरदर्शन मधील अधिकारी मोदी साहेबांच्या आदेशाचे उल्लंघन करीत आहेत.
जर हे वेतन नाही मिळाले तर १५० हंगामी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब यांना उपासमारीने मरावं लागेल आणि ह्याला जबाबदार दूरदर्शन चे निष्ठुर निर्दयी अधिकारी असतील.
कृपया आमच्या समस्ये कडे तातडीने लक्ष देऊन आमचे वेतन देण्या बाबद चे आदेश केन्द्राला दयावे अशी कळकळीची विनंती दुरदर्शन च्या हंगामी कर्मचारी यांनी केली आहे.
Comments
Post a Comment