नगरसेवक राजेंद्र शर्मा यांच्याकडून निवारा केंद्रातील बेघराना भोजनाची व्यवस्था कपडे, मास्क , साबणाचे वाटप यासाठी पोलिस निरिक्षक सतिश गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य
कळंबोली / प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिकेने उभारलेल्या काळभैरव कळंबोली निवारा केंद्रात असलेल्या नागरिकांना नगरसेवक राजेंद्र शर्मा स्वखर्चातून लाँकडाऊनच्या कालात अखंडीतपणे जेवण देत आहेत. त्याच बरोबर त्यांनी या नागरिकांना कपडे, साबण , सँनेटाझर, मास्कचेही वाटप करण्यात आले . तळोजा औद्योगिक विभागातील झोपडपट्टतील नागरिक, कळंबोली लोखंड पोलाद बाजारात अडकून पडलेले वाहन चालक , रोजनदारी व गरजू कामगारानाही त्यांच्याकडून भोजणाची व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सतिश गायकवाड यांचे मोठं सहकार्य मिळत आहे.
कोरोनाचा महामारीवर विजय मिळविण्यासाठी देशासह राज्यात लाँकडाऊन करण्यात आले. या लाँकडाऊनमध्ये कोरानापासून स्वत:ची काळजी घेताना प्रत्येकानी स्वत:ची दारे लावून घेतली. त्यावेळी लाँकडाऊनमध्ये अडकलेल्या उपासमारीची वेळ येवू नये म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी माणुसकी जपत बेघर, निराधार,मजूर, विस्तापित कामगार गरजू नागरिकांसाठी पनवेलमध्ये चार निवारा केंद्रे उभारली. त्यांना अल्पोहार, चहा,जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेने कळंबोली काळभैरव येथे उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रातील नागरिकांना पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी स्वखर्चातून भोजन व्यवस्था केली
नगरसेवक राजेंद्र शर्मा लाँकडाऊन करण्यात आल्यापासून कोरोना विरोधात नागरिकात जावून महानगरपालिका, पोलिस प्रशासनाच्या बरोबरीने काम करत आहेत. आदिवासीवाडी, रोजनदारी कामगार, गरीब गरजूना अन्नधान्य , जीवनावश्यक वस्तूच्या रुपाने मदतीचा हात पुढे केला आहे. राजेंद्र शर्मा संपर्ण लाँकडाऊनमध्ये कळंबोली केद्रातील निवारा केंद्रातील नागरिकांना जेवणाची व्यवस्था करणार आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शाखाली शासन चौकटीत राहुन त्यांच्या कार्यात मदत करताना खारीचा वाटा उचलत असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक शर्मा यांनी दिली.
Comments
Post a Comment