कळंबोलीमध्ये माँर्निग वाँक करणा-यावर गुन्हे दाखल , गुन्हे दाखल करूनही लोकं ऐकत नसल्याने पोलिस हतबल


पनवेल/ प्रतिनिधी



कोनोराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात , देशात संचारबंदी असताना  मा.पोलीस आयुक्त  नवी मुंबई यांचे आदेशानुसार व मा.पोलीस उप आयुक्त  परि- 2, मा. सहा पोलीस आयुक्त सो, पनवेल विभाग यांचे मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी सतिश गायकवाड यांनी आज रविवार ( दि १२ ) कळंबोली पोलीस ठाणे हद्दीमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या 03 महिला व 53 पुरुषांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याने IPC 188 प्रमाणे कारवाई करण्यात आली 



कोरोनाने ऱाज्यात थैमान घातले असून दिवसे दिवस बलींची संख्या वाढत आहे . राज्य प्रशासना समोर मोठा चिंतेचा विषय असून कोरानाच्या संसर्गावर मात करण्यासाठी देशाने संचारबंदी हा अति महत्वाचा निर्णय घेतला आहे.तरीही  लोकं गांभिर्याने घेताना दिसून येत नाहीत . त्यामुळे नवी मुंबई पोलिस आ़युक्त संजीव कुमार यांनी कठोर पावले उचलत विनाकरण बाहेर पडणा-या लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाने काटेकोरपणे पालन करताना कळंबोली  पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सतिश गायकवाड यांना रविवारी ( दि 12 ) सकाळी 56  जण माँर्निग वाँकला गेल्याची माहीती मिळताच त्यांनी पोलिस ठाण्यात आणून  त्यांच्याकडून कोरोनाची महामारीत बाहेर न पडण्याची  शपथ देवून त्यांच्यावर भादवि 188 गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यावेळी कळंबोली पोलिस विभागाचे पोलिस अधिकारी शैलेश जाधव यांनी महत्वाची कामगिरी बजावली  कळंबोली पोलिसाने शनिवारी ( दि ११ ) माँर्निग वाँक करणा-या ३५ जणावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असा प्रकारे लोकांवर कारवाई करूनही लोकं धडा घेत नसतील तर असा लोकांना दंडूक्याचा प्रसाद मिळल्याशिवाय यांच्यात बद्दल होणार नाही असे मत कळंबोलीतील नागरिकांनी व्यक्त केले आहे अशी लोकं स्वत:हून कोरोना संसर्ग विषाणूला आमंत्रण देत आहेत अशीही प्रतिक्रिया दिली


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर