लोक गावी जाण्यासाठी मागणी करीत आहेत. प्रशासनाने अशा लोकांचे चेकअप करून तसेच होम क्वरणाटाइन ची जबादारी घेऊन गावी पाठविण्याची व्यवस्था करावी.
लोक गावी जाण्यासाठी मागणी करीत आहेत. प्रशासनाने अशा लोकांचे चेकअप करून तसेच होम क्वरणाटाइन ची जबादारी घेऊन गावी पाठविण्याची व्यवस्था करावी.
म्हसळा : (जितेंद्र नटे)
उत्तर रायगड मध्ये म्हणजे पनवेल मनपामध्ये कोरोना बाधित रुग्ण 50 पार झाले आहेत. पण दक्षिण रायगड मध्ये हा कोरोना विषाणू कसा काय पोहोचला? सध्याचा घडीला हा एकच प्रश्न जनतेला सतावत आहे. याची नेमकी करणे काय आहेत? काय आमची सरकारी यंत्रणा कुठे कमी पडते का? कि लोकांना गांभीर्य नाही. हा रोग हवेतुन पसरत नाही. मात्र कोरोना बाधित व्यक्ती संपर्कात आला तर इतरांना होतो. श्रीवर्धन भोस्ते येथील व्यक्ती वरळीतुन आला, पण त्याला तिथेच कोरोना होता? कि नव्हता. याचे उत्तर मिळू शकले ले नाही. त्याला प्रवासात कुणाचा संपर्क झाला असेल आणि मग त्याला कोरोना झाला असेल. या सर्व घडामोडीतुन एक गोष्ट नक्की कि बाहेर पडल्यावर संसर्ग होऊ शकतो आणि चांगला व्यक्तीही रुग्ण होऊ शकतो. म्हणून पोलीस सांगत आहेत घराबाहेर पडू नका. लोकडॉनचे पालन करा. पण आपली जनता ऐकत नाही. हेच याच्यातून निष्पन्न झाले आहे. ही झाली एक बाजू आता पाहू या दुसरी बाजू ती बाजू म्हणजे पोलीस आणि प्रशासन काय करतात?
या संदर्भात म्हसळा पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक श्री. धनंजय पोरे यांच्याशी फोन वरून संवाद साधला. ते म्हणाले, ''आम्ही चेक पोस्ट म्हसळा येथे एक नोंदवही ठेवली आहे. ज्यावेळी कोणी म्हसळा-श्रीवर्धन मध्ये प्रवेश करतो तेव्हा त्यांची नोंद ठेवून त्याची माहिती ताबडतोब तहसील प्रशासन नाला दिली जाते. वरळी हुन आलेल्या व्यक्तीस आम्ही होम क्वरणाटाइनचा शिक्का ही मारला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक श्री. धनंजय पोरे यांनी दिली.
म्हणजे म्हसळा - श्रीवर्धन सरकारी प्रशासननाने आलेल्या व्यक्तीची माहिती घेऊन त्यांना त्याच वेळी लक्ष घातले असते तर आणि त्याला 5 एप्रिल लाच म्हसळा येथे होम क्वरणाटाइन केले असते तर पुढील सर्वच प्रसंग टळला असता. आणि म्हसळा - श्रीवर्धन सुरक्षित ग्रीन झोन राहिला असता.
अनेक लोक मुंबईहुन गावी प्रायव्हेट वाहनाणी तर काही चालत गेली आहेत. मात्र म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव येथे लक्ष दिले जातं नाही असे काही सूत्र सांगत आहेत. जवळ जवळ 10 - 12 हजार लोक मुबंईहुन गावी चालत किंवा मिळेल त्या वाहनाने गेली आहेत. काय सांगू शकत नाही, त्यामध्येही कोणी असू शकतो. बाहेरून आलेल्या लोकांची तपासणी करून होम क्वरणाटाइन केले तर कदाचित कोरोनाचा शीरकाव झाला नसता. आज लोकांना उगाचच गावी सुद्धा भीती झाली आहे.
सरकार लवकरच यासाठी पावले उचलून सर्वांचे चेकअप करून सुरक्षिततेचि काळजी घेणे गरजेचे आहे. म्हसळ्यातील तिघेही निगेटिव्ह आले. त्यामुळे म्हसळा कोरोना मुक्त आहे. परंतु काळजी घेणे जरुरीचे आहे. सद्या सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत दोन तासच दुकानें चालू असतात. पोलीस आणि प्रशासन जिकरीचे प्रयत्न करीत आहेत. त्यांना सहकार्य करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. मात्र गावी असणारी मंडळी बिनधास्त फिरत आहेत आणि हीच पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत. श्रीवर्धनमधील 27 लोकान्ची टेस्ट निगेटिव्ह आली. मात्र भोस्ते गावातील त्या व्यक्तीच्या घरातीलच टेस्ट पॉसिटीव्ह आल्या. त्यामुळे काळजी घेणे घरीच राहणे, या सरकारच्या आव्हानाला मान देऊन सहकार्य करणे हाच सध्यच्या घडीचा उपाय आहे.
जे रायगड पोलीस या प्रकारनाचा छडा लावत होते त्यांनाच आता क्वरणाटाइन होण्याची वेळ आली आहे. म्हणून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे आणि लोकडॉन पालन करणे गरजेचे आहे.
दुसरी गोष्ट ती अशी अनेक वर्षांपासून म्हसळा श्रीवर्धन येथे हॉस्पिटल आहेत पण ते नागरिकांसाठी उपयुक्त आहेत का ? सरकारी हॉस्पिटल फक्त नवापूरते आहेत. ना तिथे डॉक्टर ना धड औषधं. याकडेही सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. आजही 150 ते 200 किमी वरून लोकांना मुंबईलाच इलाजाला यावे लागते? मग कुठे गेला विकास? विकास फक्त शहरांचा झाला. माणगाव हे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. मग येथे एखादे मोठे हॉस्पिटल असावे अशी अनेक वर्षांपासून जनता मागणी करीत आहे. मात्र 15 वर्षे खासदार राहिलेल्या अनंत गिते यांनी काहीही केले नाही. फुकट गेली रायगड वासियांनची मते. चूक जनतेचीच आता कुठे गायब आहेत ते.
या बातमीच्या माध्यमातून संबंध जनतेच्या वतीने रायगडचे खासदार श्री. सुनिलजी तटकरे साहेब यांनी माणगाव मध्यवर्ती हॉस्पिटलच्या निर्मितीकडे लक्ष द्यावे अशी लक्षवेधी मागणी करीत आहोत आणि कोकणचे भाग्यविधाते ते करतील अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही.
दुसरा प्रश्न हा आहे नागरिकांचा तो म्हणजे रायगड जिल्यातील अनेक लोक जवळ जवळ 80 टक्के लोक ही मुंबईत नोकरी करीत आहेत. गावेच्या गावे ओस पडली आहेत. पण जर गावी एम.आय.डी.सी. असती, कंपन्या असत्या तर लोक मुंबईला गेली नसती. मात्र आमचे राजकारण इतके खराब आहे कि, याकडे कोण लक्ष देत नाहीत आणि जनता ही जागरूक नाही. काही विकास नाही काही नाही तरी लोक त्यानाच निवडून देतात. ग्रामपंचायत सरपंच, पंचायत सदस्य, सभापती, दादा, भाऊ, भाई, राजकारणी, स्वतःला समाजसेवक समजणारे, ट्रस्ट चालविनारे गेले कुठे? आता मुंबईकर अडचणीत आहे, ना हातात पैसा आहे? ना धान्य? इलेक्शन आले कि मुंबई वाले पाहिजेत मतदान करायला, गावात मयत झाला कि मुंबई वाले पाहिजेत, मंदिराला देणगी पाहिजे आहेत मुंबईकर आणि आता तेच मुंबईकर चाकरमनी अडचणीत आहेत तर काही लोक गावात येऊ नका, शहरातला रोग घेऊन असेही प्रकार काही ठिकाणी घडत आहेत. जर एखादा माणूस आला असेल तर आपल्याकडे शाळा आहेत, मंदिरे आहेत, जुने वाडे आहेत त्यामध्ये त्यांना क्वरनटाइन करू शकतो. मग भेदभाव कशाला तेपण आपलेच आहेत. आणि कोरोना हा आजार बरा होतो फक्त योग्य उपचार हवे आहेत, त्यामुळे चिंता नसावी. मुंबईपासून जवळ असून सुद्धा म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव अजून अवीकसीतच राहिला. मात्र आता राज्यमंत्री इथल्या आमदार अदिती ताई तटकरे आहेत, आमदार अनिकेत तटकरे आणि खासदार सुनिल तटकरे या भागाच्या विकासासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. भविष्यात बदल होईल. इथे कंपन्या येतील आणि रोजगार मिळेल, निदान स्वयं रोजगार तरी वाढेल, बँका लोन देतील, स्थानिक नेते मंडळी पैसे-भांडवल पूरवतील ? अशी अपेक्षा बाळगू या. (काय तरीच काय राव, आमच्या नेत्यांनाच पैसे द्या, या स्थानिक नेत्यांनी इतके वर्षे नीट विकास केला असता तर गावच्या गावे ओस पडली असती का?) कोरोना मुळे अनेक लोक गावच्या शेती कडे वळतील अशी अपेक्षा आपण बाळगू या.
आज सर्वांनाच गावी जाण्याची ओढ लागली आहे. त्यामागे कारण ही आहे. लोकांना ना रोजगार आहे? ना पैसा? दहा बाय दहाच्या खोलीत राहण्यापेक्षा गावी चटणी भाकरी खाणे परवडेल. म्हणून अनेक लोक गावी जाण्यासाठी मागणी करीत आहेत. प्रशासनाने अशा लोकांचे चेकअप करून तसेच होम क्वरणाटाइन ची जबादारी घेऊन गावी पाठविण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी लोक करीत आहेत. अनेक लोक फोन करून विचारत आहेत. या प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे लक्ष पूरवावे आणि त्यांना दिलासा द्यावा. मात्र सद्या लोकडॉन उठे पर्यंत आणि पुढील सरकारी सूचना मिळेपर्यंत कुणीही घराबाहेर पडू नये. तरच आपण हे कोरोना विरोधातील युद्ध आपण जिंकू. पोलीस, डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार, सरकारी यंत्रणा, पत्रकार तसेच पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या अदृश्य दुश्मन असलेल्या विषाणू विरोधात लढत आहेत. आपण त्यांना साथ देऊ या आणि घरीच बसून हे युद्ध लढू या. तो पर्यंत घरी रहा, सुरक्षित रहा.
Comments
Post a Comment