श्रीवर्धनमध्ये साईनाथ बियरशॉपवर पोलिसांचा छापा : लॉकडाऊन संचारबंदीत अनधिकृत देशी विदेशी मद्य विक्री करणाऱ्या तीन आरोपी सह २००४०० मुद्देमाल जप्त
श्रीवर्धन; (सोपान निंबरे/ राजू रिकामे)
कोरोना कोव्हीड १९ या विषाणूचा संसर्ग संक्रमण साखळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन संचारबंदी मध्ये जीवनावश्यक वस्तूं दुकाने वगळता बियरशॉप, वाईनशॉप, बार,परमिट रूम सर्वप्रकारची देशी विदेशी मद्य व इत्यार्दी सर्व विक्रीवर शासनाने निर्बंध घातलेला असतांना श्रीवर्धन शहरामध्ये श्रीसाईनाथ बार येथे अनधिकृत देशी विदेशी मद्य विक्री होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड व श्रीवर्धन पोलिस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने दि. १६ एप्रिल रोजी सायंकाळी श्रीसाईनाथ बार वर छापा कारवाई करण्यात आली आहे. त्यावेळी तीन आरोपींना विदेशी दारूची वाहतूक व विक्री करत असतांना अटक करून गु. र. क्र.१०/२०२० कलम ६५ खंड (ई) ८३ दारू बंदी कायद्यासह भा. द. वि. १८८ अन्वये गुन्हा नोंद केला असून श्रीसाईनाथ बारमधील २००४०० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास psp खिरड करीत आहेत. श्रीवर्धनमध्ये आठ दिवसात अनधिकृत देशी विदेशी मद्य विक्रेत्या दोन बारवर छापाकारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती श्रीवर्धन पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्याकडून प्राप्त झाली आहे.
Comments
Post a Comment