नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंबा आता मुंबईत आपल्या सोसायटीमध्ये


 


 


 


सिद्ध हापूस आंबा आता मुंबईत आपल्या सोसायटीमध्ये


·          देवगड, राजापूर, विजयदुर्ग, पावस, गणपतीपुळे, जकादेवी, दापोली, केळशी, गुहागर, श्रीवर्धन अशा कोकण पट्ट्यातील १०,००० डझनपेक्षा जास्त आंबे वितरित


·         जीआय मान्यताप्राप्त जगातील सर्वोत्तम फळाचा ब्रँड "ग्लोबल कोकण अल्फांसो "


 


मुंबई १८  एप्रिल २०२० : हापूस आंबा ही कोकणची मुख्य अर्थव्यवस्था आहे . कोकणातील शेतकऱ्यांचे उपजीविकेचे सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे हापूस आंबा.. वर्षभर शेतकरी आपल्या बागेत प्रचंड कष्ट करतात आणि वर्षातून एकदा उत्पन्न मिळते. हापूस आंब्याचा मुख्य सीजन एप्रिल आणि मे असतो यंदा याच कालावधीमध्ये “कोरोना वायरस” एक जागतिक संकट आले आहे. कोकणातील आंबा बागायतदार यामुळे असंख्य अडचणींना तोंड देत आहे. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कृषी  विभाग या  सर्व यंत्रणा आपापल्या परीने शेतकऱ्यांना मदत करीत आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्राप्त परिस्थितीत छोटी धडपड म्हणून कोकण भूमी प्रतिष्ठानने  एक अभिनव संकल्पना राबविण्याचे ठरवले आहे. यात समन्वयाचे काम कोकण भूमी प्रतिष्ठानचे स्वयंसेवक मास्क लावणे,सॅनिटीझर वापरणे आणि  (Social Distance) हे सर्व नियम पाळून कोकणातील हापूस आंबा थेट सोसायटीमध्ये नेण्याचे काम  करत आहेत. सुरुवातीला मुंबई पुणे शहरांमध्ये ही योजना  सुरु झाली आहे.  


कोकण भूमी प्रतिष्ठान “ग्लोबल कोकण हापूस” ब्रँड विकसित करत आहेत. स्वस्त दरात हापूस आंबा यामागची कल्पना नसून, शेतकऱ्यांना त्यांच्या परिश्रमाचा नीट मोबदला व हापूस आंबाप्रेमींना योग्य दरात उच्चं दर्जाचे हापूस आंबे मिळणं ही या उपक्रमाची मुख्य संकल्पना आहे. देवगड,  राजापूर,  विजयदुर्ग,  पावस, नेवरे, गणपतीपुळे,  जाखादेवी, दापोली,  केळशी,  गुहागर, श्रीवर्धन मुख्य “मँगो बेल्ट“ या परिसरातून जी आय मानांकन प्राप्त हापूस आंबा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. अतिशय दर्जेदार हापूस आंबा परवडणाऱ्या किमतीत शहरवासीयांना उपलब्ध होऊन कोकणातील लाखो शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल.


महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ,हापूस आंबा याचा दर्जा राखणारे काही शेतकरी व  कोकणभूमी प्रतिष्ठानच्या  मदतीने प्रत्येक सोसायटीमध्ये नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंबा शेतकऱ्यांकडून थेट उपलब्ध करून दिला जात आहे . मुंबई पुणे ठाणे, वसई पिंपरी अशा प्रमुख शहरात  सर्व विभागात सोसायटीमध्ये हा आंबा शेतकऱ्यांकडून थेट उपलब्ध करून दिला जात आहे.  या योजनेमध्ये पाच डझन या श्रेणीमध्ये बागेतच नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले ताजे हिरवे आंबे ग्राहकांना उपलब्ध करत आहे. ग्लोबल कोकण व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या योजनेला हापूस आंबा प्रेमी ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.


कोकण भूमी प्रतिष्ठानचे संस्थापक संजय यादवराव म्हणाले, “कोरोनामुळे जग बदलत आहे म्हणून लोक रासायनिक पेक्षा ऑरगॅनिक धान्य,फळे आणि भाज्यांना जास्त प्राधान्य देत आहेत. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला व  भरपूर सी जीवनसत्व, रोगप्रतिबंधक शक्ती वाढवण्याकरता अत्यंत आवश्यक असलेला हापुस आंबा  या कोरोना संकटाच्या कालावधीमध्ये एक अत्यावश्यक आहे. जीआय मान्यताप्राप्त दर्जेदार हापूस आंबा हापूस प्रेमी ग्राहकांना मिळावा व योग्य पद्धतीने आंब्याची काळजी घेणाऱ्या मेहनती शेतकऱ्यांना त्यांच्या परिश्रमाचा योग्य मोबदला मिळावा म्हणून हापूस आंब्याचा कोकणचा “ग्लोबल कोकण अल्फांसो” ब्रँड विकसित करण्याचे आम्ही ठरवले.  आतापर्यन्त आम्ही विविध शहरांमधील  १०० सोसायट्यांमध्ये २००० पेट्यांमधून सुमारे १०,००० डझन आंबे वितरित केले आहेत. ५ डझन ,४ डझन आणि २ डझन अशा तीन  प्रकाराच्या पेट्यांकमध्ये वितरीत केले जात आहेत. पेट्यांची ऑनलाईन बुकिंग चालू आहे आणि आता लवकरच "हापूस शेतकरी बाजार" डिजिटल प्लॅटफॉर्म अँप सुरु होत आहे.. ह्या कोरोनाच्या अडचणीच्या काळातही मुंबई,पुणे शहरातून  ह्या सगळ्या उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.यात जी आय मानांकन प्राप्त कोकणातील ओरिजिनल हापूस देवगड, राजापूर, पावस, केळशी, दापोली या परिसरातून थेट शेतकऱ्यांच्या बागेतून येणार आहे.”


वर्षभर शेतामध्ये घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचा योग्य व चांगला मोबदला मिळावा व हापूस आंबा प्रेमी ग्राहकांना मिळावा याकरिता सुरू झालेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.ज्यांना आपल्या सोसायटीमध्ये या योजनेत सहभागी व्हायचे आहे, स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे त्यांनी संपर्क साधावा.नाव नंबर द्यावा.


कोकण भूमी प्रतिष्ठान, ग्लोबल कोकण


Online booking is underway on www.globalkokan.org and www.kokanclub.org


Contact: 9167349111


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर