आमदार महेंद्र दळवी आणि शिवसेना शाखा प्रमुख रोहन गायकवाड (बिन्दास्त) यांनी माहिते हॉस्पिटल मध्ये अडकलेल्या रुग्णाच्या वडिलांना केले मोलाचे सहकार्य

आमदार महेंद्र दळवी आणि शिवसेना शाखा प्रमुख रोहन गायकवाड (बिन्दास्त) यांनी माहिते हॉस्पिटल मध्ये अडकलेल्या रुग्णाच्या वडिलांना केले मोलाचे सहकार्य


पनवेल (जितेंद्र नटे) :  कु.किमया अविनाश घरत राहणार -नवेदर बेली(अलिबाग) या मूलीचे नवीन पनवेल येथील 'श्री.साई क्लिनिक (मोहिते हॉस्पिटल) येथे उपचार चालु होते.मुलीची तब्येत व्यवस्थित झाली असताना बिलाचा भरणा न केल्यामुळे  डिस्चार्जे मिळत नव्हता. मुलीचे वडील श्री अविनाश बाळकृष्ण घरत यांनी त्यांचे मित्र  श्री प्रकाश पाटील यांना याबद्दल संगीतले   आणि श्री प्रकाश पाटील यांनी  गोरगरिबांचे कैवारी सन्माननीय आमदार रायगड जिल्हा प्रमुख श्री महेंद्रशेठ दळवी यांच्याकडे या बाबत कैफियत मांडली.सन्मानीय आमदार श्री महेंद्रशेठ दळवी यांनी शिवसेना नवीन पनवेल शहर प्रमुख श्री रुपेश ठोंबरे(बिनधास्त) यांना या बाबत आवश्यक सूचना देऊन संबंधित पेशंटचे वडील अविनाश घरत यांना सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आदेश दिले.शिवसेना शहरप्रमुख श्री रुपेश ठोंबरे(बिनधास्त) आणि शाखा प्रमुख श्री रोहन गायकवाड यांनी त्वरित डॉ.मोहिते हॉस्पिटल न.पनवेल येथे जाऊन मुलीच्या वडिलांकडून त्याची समस्या जाणून घेतली मुलीचे वडील स्वतः रिक्षा चालक असून सध्या कोरोनाच्या बंदीमुळे आर्थिक समस्येमुळे बिल भरण्यास त्यांची असमर्थता दर्शवली गोरगरिबांचा कळवळा असणाऱ्या या लोकप्रतिनिधींनी हॉस्पिटल प्रशासनाशी चर्चा करून तेथील डॉक्टरांची समजूत काढली डॉक्टरांनीही मोठ्या मनाने  त्याचे सर्व बिल माफ करून त्यांना डिस्चार्जे दिला,अलिबाग येथील परमदयाळू शिवसेना आमदार यांच्या मुशीत तयार झालेले त्यांच्या या कार्यकर्त्यांनी एवढ्यावरच न थांबता त्यांना अलिबाग येथे स्वगृही जाण्यासाठी स्वस्त दरात Ambulance ची व्यवस्था  करऊन देऊन त्यांना सुखरुप घरी पोहचण्यास अमूल्य मदत केली त्या बद्दल किमयाचे वडील श्री अविनाश घरत यांनी आमदार श्री महेंद्रशेठ दळवी आणि शिवसेना शहरप्रमुख श्री रुपेश ठोंबरे(बिनधास्त) यांचे आभार मानले.कोरोनाच्या या संसर्गामुळे होणारा धोका लक्षात घेता ज्या परिस्थितीत स्वतःचे नातेवाईकही संसर्ग टाळतात अश्या स्थितीत स्वतःचा जीव धोक्यात टाकून शिवसेनेच्या या समाजभिमुख कार्यकर्त्यांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर