खरसईकरांची एकजूट हीच आपली वज्रमूठ ...असे म्हणत खरसईगावातील सर्व समाजातील आणि राजकीय पक्षातील गावकरी कोरोना विरुद्ध लढ्यात झाली एकत्र
एक दिवस गावासाठी या संकल्पनेतून *गुरुवार दि १६/०४/२०२० रोजी* खरसई ग्रामपंचायत हद्दीत *जनता कर्फ्युचे* आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला गावातील सर्व समाजातील नागरिकांनी तसेच आपत्ती व्यवस्थापन समिती, सर्व सदस्य, ग्रामपंचायत खरसई,आगरी समाज,मुस्लिम समाज,कोळी समाज बौद्ध समाज,गावातील सर्व सामाजिक संस्था,सर्व राजकीय पक्ष यांनी कोविड-१९ करोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात सहभागी होऊन खरसईकरांची एकजूट दाखवली याबद्दल मी आपला आभारी आहे. यापुढे ही विनंती आहे की शासनाने दिलेले सर्व निर्देश पाळा व करोना टाळा.
*कोवीड १९ करोना विषाणू काळजी करू नका....काळजी घ्या*
Comments
Post a Comment