आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 'मोदी भोजन' कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवणाची मदत
पनवेल(प्रतिनिधी) कोरोना व्हायरस आणि त्यामुळे असलेल्या लॉक डाऊन परिस्थितीत गरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी दानशूर नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भाजपच्यावतीने खारघर, कामोठे, पनवेल या ठिकाणी मोफत अन्नछत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने पनवेल शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील मुनोथ इम्प्रेस सोसायटीजवळ 'मोदी भोजन' कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दररोज दुपारी १२ ते दुपारी १ वाजेपर्यत ३०० गरीब गरजू नागरिकांना मोफत जेवण दिले जात आहे. लॉककडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम चालूच राहणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मागर्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. आज आमदार प्रशांत ठाकूर, सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, चंद्रकांत मंजुळे, पवन सोनी, राहुल वाहुळकर यांच्या हस्ते आणि सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करून बेघर, मोलमजुरी, गरजूंना वणाचे वाटप करण्यात आले.
रायगडचे लोकमत 'रायगड मत'
संपादक :- जितेंद्र नटे ✍️
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा :-
📲 8652654519
📲 9137595224
Email : raigadmat@gmail.com
🌍 Website : raigadmat.page
🎤 News Channel - News81रायगड मत
https://www.youtube.com/channel/UCLPo_3uBeBf7J7JAxssbZlg
Comments
Post a Comment