संयम बाळगा, घरीच रहा, लॉकडाऊनचे पालन करू या, कोरोनाला हरवू या - आमदार अनिकेत तटकरे
जितेंद्र नटे :
दक्षिण रायगड जिल्ह्यातील विशेष करून श्रीवर्धन मतदारसंघातील अनेक लोक 'रायगड मत'चे संपादक जितेंद्र नटे यांना फोन करून, तसेच व्हाट्सअप करून गावी जाण्याविषयी तसेच लोकडाऊन विषयी विचारणा करीत आहेत. लोकांच्या अडचणी समजून रायगड जिल्ह्याचे युवा आमदार अनिकेत तटकरे यांच्याशी संपर्क साधून पुढे काय करता येईल का? लोकांना कशी मदत करता येईल? यासाठी काही उपाययोजनाची अंमलबजावणी करता येईल का यासाठी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये आमदार अनिकेत तटकरे यांनी काही सूचना आणि आपले 'मत' - 'रायगड मत' कडे व्यक्त केले. त्यामधील काही ठराविक मुद्दे आम्ही रायगड जिल्ह्यातील विशेष करून म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव, रोहा, महाड, पोलादपूर येथील जनतेपर्यंत पोहोचवत आहोत. ते पुढे म्हणाले कि,
• लोकडाऊन शिथिल झाल्यावर अडकलेल्या मुंबईकर चाकरमन्यांची गावाकडे जाण्याची व्यवस्था केली जाईल. तोपर्यंत कुठेही बाहेर पडू नका.
• सरकारी नियमांचे पालन करा. सरकारला सहकार्य करा. पुढचे निर्देश मिळेपर्यंत संयम बाळगा. महाराष्ट्र सरकार ज्या काही उपाय योजना करीत आहेत. ते आपल्यासाठीच आहेत. थोडा त्रास होतोय पण पुढील धोका टाळण्यासाठी आता कठोर केलेले नियम याचे फायदेही दिसू लागले आहेत. हळू हळू परिस्थिती नियंत्रनात येत आहे.
• अनेक लोक गावाकडे तसेच मुंबईत आहेत. त्यामध्ये जे जे गरजू तसेच कुठे अडचणीत आहेत आणि ज्यांची माहिती आमच्या पर्यंत पोहोचत आहे अश्याना अन्न धान्य तसेच इतर वैधकीय मदत मिळवून देण्याची व त्यांची अंमलबजावणी करण्याची तरतूद करीत आहोत.
• सध्या आपल्याला कोरोनाला हरवायचे आहे म्हणून घरीच थांबा कुठे प्रवासात मधेच अडकन्याची शक्यता आहे. जशी पुढील सूचना मिळेल आपणास सहकार्य केले जाईल.
• गेल्या दोन दिवसामधे रायगड जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण सापडला नाही, ही एक चांगली न्युज आहे. अशीच परिस्थिती राहिली तर ज्या ज्या ठिकाणी धोका नाही अश्या ठिकाणी लॉकडाउन शिथिल होईल. तोपर्यत आहात तसेच रहा, आपल्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री आदिती ताई तटकरे आणि खासदार सुनिलजी तटकरे साहेब खूप चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळत आहेत. अनेक ठिकाणी स्वतः जातीने सक्रिय राहून जी काही वैद्यकीय मदत हॉस्पिटलसाठी पाहिजे आहे ती उपलब्ध करीत आहेत. त्या सोबतच आपले पोलीस बांधव, डॉक्टर्स, नर्स, सरकार तसेच पत्रकार काम करीत आहेत.
• आपण त्यांना सहकार्य करू या आणि कोरोना पासून आपल्याला आणि देशाला वाचवू या. इतर देशात काय स्थिती आहे? हे आपणांस ठाऊक आहेच. तरी संयम बाळगा. घरी राहणे हाच सध्याचा एकमेव उपाय आहे. गावाकडील लोकांची काळजी करू नका, जेवढे शक्य होईल तेवढी आम्ही स्थानिक लोकांना मदत करीत आहोत. अनेक ठिकाणी काही लोक मुंबईहुन चालत आली होती त्यांना त्यांच्या ठिकाणा पर्यंत पोहोचविन्याची व्यवस्था केली आहे. मात्र आता कुणीही बाहेर पडू नका, मधल्या मध्ये अडकन्यापेक्षा घरीच रहा, पोलीस प्रवासात मिळणाऱ्या व्यक्तींना निवारा केंद्रात थांबवत आहेत. त्यामुळे घरीच थांबा आणि स्वतःला आणि देशाला वाचवू या. लवकरच या संकटातुन आपण बाहेर पडू हीच अपेक्षा. असे आवाहन (निवेदन) त्यांनी 'रायगड मत' शी बोलताना सादर केले.
अश्या प्रकारे अनेक प्रकारच्या सूचना निवेदन त्यांनी रायगडकराना विशेष करून श्रीवर्धन मतदार संघातील नागरिकांसाठी केल्या आहेत. आपण सर्वांनी त्या पाळून एक प्रकारे देश सेवा करू आणि कोरोनाला लवकरात लवकर हरवू या.
raigadmat.page
News81रायगड मत
Comments
Post a Comment