श्रीवर्धन तालुक्यात कोरोना बाधित रुग्णात वाढ ; नागरिकांमध्ये चिंतेजनक वातावरण ,आरोग्य व पोलीस यंत्रणेच्या आव्हानात वाढ


 


 


 


(श्रीवर्धन; सोपान निंबरे/ राजू रिकामे)


 श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते परिसरातील पहिल्या व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने श्रीवर्धनमध्ये सर्वत्र  भीतीजनक खळबळ उडाली असतांना त्यामध्ये आजच्या नवीन कोरोना चाचणी मध्ये चार जणांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने सर्वांच्या चिंतेत वाड झाली आहे. सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २८ व्यक्तींना कोरोना चाचणी करिता पनवेल येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी भोस्ते गावातील रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून बाकी इतर संपर्कात आलेल्या खाजगी डॉक्टर व स्टाप, रक्त तपासणी करणारे डॉक्टर तसेच रिक्षा चालक, दुचाकी चालक व इतर संपर्कात आलेल्या व्यक्तींचा रिपोर्ट नेगिटिव्ह असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अचानक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांत झालेली वाढ पाहून नागरिकांच्या काळजाच्या ठोक्यांमध्येही वाड झाली असून श्रीवर्धन कोरोना पश्वभूमीवर जी यंत्रणे काम करत आहेत त्यांच्याही आव्हानात मोठी जबाबदारीची भर पडली आहे.अस असतांना  तालुक्यात अनेक चाकरमानी मुंबई पुणे येथून येत आहेत त्यामुळे स्थानिक पातळीवर रहाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षितेच्या चिंतेत ही वाढ झाली आहे. कोरोना हॉस्पॉट बाधित भागातून बंदोबस्त असतांना चाकरमानी गाडी किंवा पाई चालत येत आहेत ही मोठी चिंतेची बाब आहे.अशी चर्चा नागरिक करीत आहेत.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर