खांदा वसाहत, खारघर, कामोठे आणि नेरे येथे चार कोरोना रुग्ण सापडले
पनवेल, दि.१८ (वार्ताहर) :
पनवेल परिसरात कोरोना एक प्रकारे फोफवताना दिसत आहे. शनिवारी खांदा वसाहत, कामोठे, खारघर आणि नेरे येथे प्रत्येकी एक असे पाच रुग्ण आढळून आले. त्यामुळे पनवेलकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे नेरे पट्ट्यात कोरोना पोचल्याने ग्रामीण भागातही आता सावधानगी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
कामोठे वसाहतीत सापडलेला रुग्ण हा ताज हॉटेलमध्ये शेफचे काम करत होता. या हॉटेलमध्ये संक्रमित अन्य ८ व्यक्तीबरोबर यांचाही समावेश आहे . सध्या ती व्यक्ती नवी मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे . खांदा कॉलनी येथील ८४ वर्षाच्या एका महिला कोव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेली आहे. संबंधित रुग्ण किडनी व निमोनिया अशा दुर्दम्य आजारापासून गेल्या २ वर्षापासून ग्रस्त आहेत . या महिलेला पनवेल उपजिल्हा रूग्णालय दाखल करण्यात आले होते परंतु पुढील उपचारासाठी त्यांना एम . जी . एम . रूग्णालय , कामोठे येथे स्थलांतरीत केले आहे . खारघर येथील सेक्टर २० मधील १ व्यक्तो कॉव्हिड – १९ पॉझिटिव्ह आलेली आहे . सदर व्यक्ती १७ मार्च २०२० पासून डी . वाय . पाटील हॉस्पीटल , नवी मुंबई येथे हदय रोगावर उपचार घेत आहे . नेरे येथील एक व्यक्ती कोरोना विषाणूंनीने बाधित झाली आहे. ती व्यक्ती ओकार्ड हॉस्पीटल , मुंबई येथे लॅब टेक्नोशन म्हणून काम करीत होती . ओकार्ड हॉस्पीटलने त्यांच्या सर्व टेक्नीशनच्या केलेल्या तपासणीमध्ये सदर टेक्निशियन कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आता सदर व्यक्ती पुर्णपणे बरी झाली असून त्यांना सेवन हिल्स हॉस्पीटलमध्ये अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे . त्याचबरोबर जासई रेल्वे कॉलनी मध्येही एका युवकाला संसर्ग झाला आहे. आज नव्याने समाविष्ट ५ ही रूग्णांमध्ये कोणत्याही प्रकारे कम्युनिटी स्प्रेडिंग नसून संबंधितांना बहुतांशी हॉस्पोटलमध्ये संसर्ग झालेला असावा असा प्राथमिक निष्कर्ष आहे . संबंधित सर्व हॉस्पीटल व्यवस्थापनाला लेखी पत्राने कळवून दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
Comments
Post a Comment