नामांकित 'एज्युकेशन वर्ल्ड' ची टॉप रँकिंग यादी जाहीर ,भारतात पनवेलच्या सीकेटी महाविद्यालयाचा पहिल्या शंभरमध्ये समावेश 


 


 


 


पनवेल(प्रतिनिधी) दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, सामजिक क्षेत्रातही उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या नामवंत अशा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल येथील चांगू काना ठाकूर (स्वायत्त) महाविद्यालयास देशात ६९ वे तर राज्यात २१ वे रँकिंग प्राप्त झाले आहे. 


राष्ट्रीय स्तरावरील 'एज्युकेशन वर्ल्ड' या मासिकाने एप्रिल २०२० च्या विशेषांकामध्ये सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील भारतातील खाजगी स्वायत्त महाविद्यालयांध्ये अव्वल स्थान मिळवलेल्या महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पनवेल येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर स्वायत्त कॉलेज या महाविद्यालयाचा समावेशझाला आहे. या महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली तसेच मुंबई विद्यापीठाने स्वायत्तता बहाल केली असून अत्यंत अल्पावधीमध्ये चांगू काना ठाकूर कॉलेजने खूप मोठे यश प्राप्त केले आहे.


भारतामध्ये ७४७ स्वायत्त महाविद्यालये आहेत. 'एज्युकेशन वर्ल्ड' ने चांगू काना  ठाकूर  महाविद्यालयाला अर्थात सी. के. टी. कॉलेजला राष्ट्रीय स्तरावरील ६९ वे आणि राज्यस्तरावरील २१ वे क्रमांकाचे रँकींग दिले आहे. कॉलेजमधील प्राध्यापकांची क्षमता, प्राध्यापक कल्याण आणि विकास, अभ्यासक्रमाचे अध्यापन, प्लेसमेंट, पायाभूत सुविधा आणि नेतृत्वाची गुणवत्ता या निकषांमध्ये महाविद्यालयाने  स्वायत्तता मिळाल्यापासून कठोर परिश्रम घेतले आहेत व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे एक महत्वाचे केंद्र बनले आहे.


            जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी २६ सप्टेंबर १९९७ रोजी चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची स्थापना केली.  सर्व स्तरातील दर्जेदार शिक्षण देण्याचे आणि अनेक करिअर आधारित पारंपारिक आणि वैशिष्टयपूर्ण कार्यक्रमांसह प्रभावी शिक्षण आणि शिकण्याची सुविधा या महाविद्यालयाने उपलब्ध करुन दिल्याने हे महाविद्यालय सक्षमपणे आधुनिकीकरणाच्या युगात सक्षमपणे कार्यरत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी हे विद्यालय आणि संस्था काम करीत आहे.  लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या  चांगू  काना  ठाकूर स्वायत्त महाविद्यालयास यापूर्वीच नॅक पुनर्मुल्यांकन द्वारे ए प्लस (A+)' दर्जा मानांकित, विद्यापीठ अनुदान आयोगाचा 'श्रेष्ठत्व सक्षम' महाविद्यालय दर्जा आणि मुंबई विद्यापीठातील 'सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पारितोषिक तसेच अनेक पुरस्कार व मानांकन प्राप्त झाले आहेत. आता या महाविद्यालयास 'एज्युकेशन वर्ल्ड' कडून आणखी एक मोठा बहुमान प्राप्त झाला असून महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. पनवेलसह, रायगड, नवी मुंबई, मुंबई तसेच राज्यभरात चांगू काना ठाकूर महाविद्यालयाचे नावलौकिक असून या यशामुळे पनवेल परिसर, नवी मुंबई तसेच मुंबई विद्यापीठ स्तरावरील अधिकारी, नागरिक व कार्यकर्ते यांच्याकडून या महाविद्यालयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 


        त्याचबरोबरीने रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांनीही यामध्ये बहुमान मिळविले आहे. यामध्ये वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने देशात ५५ व राज्यात १५ वी रँकिंग प्राप्त केली आहे.  सातारा येथील धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाने देशात ५९ वे आणि राज्यात १७ वे, कराड येथील सदगुरु गाडगेबाबा महाराज महाविद्यायाने देशात ७४ वे आणि राज्यात २३ वे तसेच सातारा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने देशात ७९ वे आणि राज्यात २६ वे रँकिंग मिळविले. रयत शिक्षण संस्थेच्या या चार महाविद्यालयानेही 'एज्युकेशन वर्ल्ड' च्या यादी स्थान मिळवून दर्जेदार शिक्षणाची परंपरा कायम ठेवली आहे. 


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर