माणगाव तालुका रेशनिंग दुकानदार संघटनेतर्फे करोनाग्रस्तांना तीन लाखाची मदत
श्रीवर्धन सोपान निंबरे; संपूर्ण जगासह देशात व राज्यात धुमाकूळ घातलेल्या करोना व्हायरसने जगाचीच परिस्थिती बिकट केली असून परिस्थिती ठंप्प पडल्याचे दिसत आहे.रायगड जिल्हा रेशनिंग रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेने यावेळी सामाजिक परिस्थितीचे भान ठेवत धान्य दुकानदारांना महिन्याचा मिळणारा पाॅस रिबेट हा प्रतिक्विंटल १५० रूपये ईतका असतो त्यामुळे जिल्ह्यात १३६९ दुकानदारांना मिळणारा धान्याचा साठा ८००० मेट्रिक टन इतका आहे. सबंध जिल्ह्यात एकूण दुकानदारांना मिळणारा रिबेट हा जवळपास एक कोटीहून अधिक असल्याने रायगड जिल्हा मुख्याधिकारी यांच्यामार्फत करोनाग्रस्त पिडीतांसाठी मुख्यमंन्त्री सहाय्यक निधीला १ कोटीहून अधिक रक्कम जमा करणार असल्याचे रायगड जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी जाहिर केले होते यांतील माणगाव तालुक्यांतील असलेला रिबेट हा जवळपास तीन लाख जमा करून तो आमदार भरत गोगावले, रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर, तहसीलदार प्रियांका अहिरे यांच्या उपस्थितीत रेशनिंग धान्य जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांच्याकडे तीन लाखाचा चेक सुपुर्द करण्यात आला.
Comments
Post a Comment