नवी मुंबई विशेष गुन्हे शाखेच्या सहाय्यक  पोलिस आयुक्तपदी विनोद चव्हाण यांनी पदभार स्वीकारला

 


 


 


 



पनवेल: पनवेल पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी कार्यरत असताना बढती मिळालेले विनोद चव्हाण यांची नवी मुंबई विशेष गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी आज पदभार स्वीकारला.
विशेष शाखेचे पोलिस आयुक्त गोवेकर यांची बदली पुण्यात झाली आहे. त्यांच्या रिक्त जागी चव्हाण यांनी पदभार घेतला. चव्हाण यांना मुंबई रेल्वे विभागात बढतीनंतर बदली देण्यात आली होती. तिथे त्यांनी काही महिने काम केल्यावर राज्य शासनाच्या गृहखात्याकडून त्यांना नवी मुंबईत पाठवण्यात आले आहेत. 2020 मध्ये चव्हाण या पदावरून निवृत्त होतील. पोलिस उपनिरीक्षक ते सहाय्यक पोलिस आयुक्त असा त्यांच्या कार्याची चढता आलेख कौतुकास्पद राहिला आहे.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर