लॉकडाऊन मध्ये काय सुरु? काय बंध?


 


२० एप्रिल पासून किराणामालाचं दुकान, रेशनचं दुकान, फळ, भाज्या, मांस-मच्छी, पोल्ट्री, खाद्यान्न, डेअरी, दुधाची केंद्र आणि गुरांच्या खाद्यान्नाची दुकानं सुरू


• ग्रामीण भागात सुरू होणार कारखाने.
• शेतकऱ्यांना दिलासा.
• बँक, पेट्रोल पंप सुरू.
• आयटी सेक्टर सुरु.
• शाळा महाविद्यालये बंद.
• रस्ते निर्मितीला सुरु.
• फार्मा इंडस्ट्रीला सुरु.
• बस आणि मेट्रो बंद.
• करोना हॉटस्पॉट विभागात बंद.
• मास्क घालणं बंधनकारक


लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात काही क्षेत्रांना सरकारनं दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागांना दिला देण्याचा सरकारनं प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे खाण्यापिण्याचे सामान तयार करण्याऱ्या आणि औषधांच्या कंपन्यांनाही दिलासा दिला आहे. दुसरीकडे रोजंदरीवर काम करणारे, प्लंबर, सुतारकाम करणारे, इलेक्ट्रीशिअन आणि मोटर मेकॅनिक्स यांनाही नव्या लॉकडाउनमधून सुट देण्यात आली आहे.
लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात ट्रान्सपोर्ट सेवा मात्र बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर शाळा आणि महाविद्यालयंही बंद ठेवण्यात येणार आहेत. ज्यांना यातून सुट देण्यात आली आहे त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. ही सुट २० एप्रिलपासून लागू होणार आहे.


*ग्रामीण भागात सुरू होणार कारखाने*
ग्रामीण भागात कारखाने सुरू करण्याचे निर्देश सरकारने दिले आहे. नव्या गाईडलाईन्सनुसार मनरेगाच्या सर्व कामांना परवानगी देण्यात आली आहे. याअंतर्गत सिंचन आणि जल संरक्षणाच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे.


*बँक, पेट्रोल पंप सुरू राहणार*
लॉकडाउनच्या कालावधीत बँक, विमा कार्यालये, पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत. या कालावधीत त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागणार आहे.


*या दुकानांना सुट*
किराणामालाचं दुकान, रेशनचं दुकान, फळ, भाज्या, मांस-मच्छी, पोल्ट्री, खाद्यान्न, डेअरी, दुधाची केंद्र आणि गुरांच्या खाद्यान्नाची दुकानं सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.


*आयटी सेक्टरला सूट*
लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारनं आयटी सेक्टरला सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच या ठिकाणी ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह कार्यलये सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.


*शेतकऱ्यांना दिलासा*
लॉकडाउनमध्ये शेतीशी निगडीत सर्वांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. शेतीशी निगडीत सर्व कामं सुरूच राहणार आहेत. शेतकरी आणि मजुरांना हार्वेस्टींगशी निगडीत कामं करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कृषी उपकरणं, त्यांच्या दुरस्तीची दुकानं सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. पशू खाद्य, बियाणं, किटकनाशकांची दुकानंही सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसंच मत्स्यपालनाच्या व्यवसायालाही परवानगी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त एपीसी निश्चित करणाऱ्या संस्थांनाही यातून सुट गेण्याक आली आहे. कृषी उत्पन्ना बाजार समितीद्वारे सुरू असलेल्या मंडईंनाही दिलासा देण्यात आला आहे.


*फार्मा इंडस्ट्रीला सुट*
औषधं, फार्मा, वैद्यकीय उपकरणं यांसह आवश्यक सामानांच्या निर्मितीशी निगडीत व्यवसायांना सूट देण्यात आली आहे. ग्रामीण क्षेत्रात फूड प्रोसेसिंग युनिट्सनाही काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.


*रस्ते निर्मितीला सुट*
सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत रस्त्यांच्या दुरुस्तीच्या आणि त्यांच्या निर्मितीच्या कामांना सुट देण्यात आली आहे. सिंचन प्रकल्प आणि इमारतींच्या उभारणीच्या कामांनाही सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरी क्षेत्रात ज्या ठिकाणी कामगार त्या प्रकल्पाच्याच ठिकाणी राहत असतील अशा इमारती उभारणीच्या कामाला परवानगी देण्यात आली आहे.


*शाळा महाविद्यालये बंद*
चित्रपटगृहे, मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल आणि बार ३ मे पर्यंत बंद ठेवण्यात येणाक आहेत. याव्यतिरिक्त शैक्षणिक संस्थानं, कोचिंग सेंटर, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानसेवा, रेल्वे सेवा ३ मे पर्यंत बंद राहतील.


*बस आणि मेट्रो बंद*
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, तसंच दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या बस, मेट्रो सेवा ३ मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त सामाजिक, राजकीय, खेळ, धार्मिक कार्य, धार्मिक स्थळं, पूजा स्थळं ३ मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.


*करोना हॉटस्पॉट विभागात सूट नाही*
करोनाचे हॉटस्पॉट ठरवण्यात आलेल्या विभागांमध्ये कोणतीही सुट देण्यात येणार नाही. या विभागांमध्ये आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या निर्देशांचं पालन करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना आपल्या घराबाहेर पडता येणार नाही. तसंच जीवनावश्यक वस्तूंचा घरपोच पुरवठा करण्यात येणार आहे.


*मास्क घालणं बंधनकारक*
नव्या निर्देशांनुसार सर्वच सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आलं आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थूंकणं हा दंडनीय गुन्हा असेल आणि यासाठी मोठा दंडही ठोठावण्यात येणार आहे.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर