जासई मंडळ अधिकाऱ्यांनी केले परराज्यातील गरीब मजुरांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल : राज भंडारी
कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी लॉकडाऊन करून संपूर्ण देशाला सरकारने कोरोनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यामध्ये हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची उपासमार होताना दिसून येत असल्यामुळे उरण तालुक्यातील जसाच्या मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांनी तहसीलदार उरण मा श्री भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शना खाली आपले सहकारी तलाठी सोबत घेऊन येथील पर राज्यातून आलेल्या मजुरांच्या दोनवेळच्या अन्नाची खळगी भरण्याचे काम केले आहे. यावेळी त्यांनी जीवनावश्यक वस्तूंमध्ये किराणा सामान या मजुरांना देऊ केल्यामुळे नकळत या मजुरांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान पाहून मदतनिसांनाही आपण केलेल्या कार्याची पावती मिळाली आहे.
यावेळी मंडळ अधिकारी जासई संदीप भंडारे यांनी स्वतः 8000 kg धान्य त्याच्या स्थरावर उपलब्ध केले आणी त्यांचे सहकारी विंधणे तलाठी दीपक पाटील तलाठी, जासई तलाठी डी.एल.पवार, करल तलाठी वैशाली पाटील, शेवा तलाठी विजेंद्र गायकवाड यांनी एकत्र येऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे. जासई विभागात मोठ्या प्रमाणावर कंटेनर यार्ड आहेत. तसेच परराज्यातील अनेक वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर याठिकाणी होत असते. त्यामुळे रोजंदारीवर काम करण्यासाठी परराज्यातून मजूर याठिकाणी मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. मात्र देशभरामध्ये २२ मार्च २०२० पासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांची काही दिवसानंतर उपासमार सुरु झाली. याची माहिती आपल्या सहकाऱ्यांमार्फत मिळाल्यानंतर जासई मंडळ अधिकारी संदीप भंडारे यांनी इतर सहकारी तलाठी यांना सोबत घेऊन या मजुरांच्या जीवनावश्यक वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा विडा हाती घेतला. एका बाजूला शासनाच्या कामाचा ताण सांभाळत ते परराज्यातील हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब मजुरांनाही मदत पोहोचविता आहेत.
संदीप भंडारे हे नाथजोगी समाजातील असून त्यांनी इतर समाजात दाखविलेली माणुसकी आणि कृतज्ञता आपल्या समाजबांधवांप्रती सुद्धा दाखविली आहे. त्यांनी त्यांच्या समाजातील जे बांधव पनवेल आणि डोंबिवली परिसरात राहत्या आहेत त्या अडचणीत सापडलेल्या बांधवांनाही त्यांनी सढळ हस्ते मदत पोहोचविली आहे. यावेळी एक शासनाचे कर्तव्य पार पडताना माणूस थकून जात असतानाच संदीप भंडारे यांनी माणुसकीचा धर्म पाळून आपले शासकीय कर्तव्य बजावत परराज्यातील मजूर कामगारांसह समाज बांधवांसाठी देवदूतासारखे उभे राहिल्यामुळे त्यांचे सर्वच थरातून कौतुक केले जात आहे.
Comments
Post a Comment