पनवेलमधील  42349  गरजूंना मनपा मार्फत भोजन  27 सामाजिक संस्थांची भरघोस मदत- आयुक्त गणेश देशमुख

पनवेल : वार्ताहर 


        लॉकडाउनमुळे हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची उपासमार होत असल्यामुळे याची गंभीर दखल शासनाने घेऊन असून राज्यातील गोरगरीब जनतेला  उपाशी न ठेवता जेऊ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 


     याच पार्श्वभूमीवर पनवेल मनपा हद्दीत  शुक्रवार दिनांक 9 एप्रिल पर्यंत 42,349 लोकांना जेवण दिले आहे.


       यावेळी पनवेलमधील सामाजिक संस्थांनीही आयुक्त गणेश देशमुख व उपायुक्त जमीर लेंगरेकर  यांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांना मदत करणे शक्य झाले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 


        यावेळी आयुक्तांनी आवाहन केले आहे की, ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी वस्तू रूपाने किंवा आर्थिक मदत करावी. वस्तू रूपाने देणाऱ्या दानशूर व्यक्तीने जेवढे सामान दिले असेल तेवढ्या सामानाचे वाटप कसे झाले याचा अहवाल  देण्यात येईल. 


       या साथीच्या रोगात  माणुसकी दाखविण्याची एक उत्तम संधी स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या आवाहनाला पनवेलमधील अनेक उद्योजक, बिल्डर  आणि सेवाभावी संस्थांनी सढळ मदतीचा हात पुढे करत आहेत. अनेकांनी आणखी पुढे यायची गरज आहे.


       यासाठी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या नियंत्रणाखाली भोजन समिती कार्यरत असून श्री.अरूण कोळी, श्रीमती विनया म्हात्रे व श्री.नवनाथ  थोरात हे रात्रीचा दिवस करून काम करत आहेत. तसेच निवारागृह तयार करण्यात आलेले आहे. त्याची जबाबदारी श्रीमती तेजस्विनी गलांडे, श्री. संजय हिंगमिरे व श्री.राजेश कर्डिले यांच्याकडे आहे. या निवारागृहात स्थलांतरीत मजूरांना निवारा उपलब्ध करण्यात आलेला आहे. अनेक बेघरांना देखील येथे निवारा उपलब्ध करण्यात आला आहे. सुमारे 300 व्यक्ती रोज अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था केली आहे.


      यावेळी ज्या ज्या सेवाभावी संस्थांनी मनपाकडे मदत केली आहे त्या सर्वांचे आयुक्तांनी आभार मानले आहेत तसेच अजूनही अन्य उद्योजकांनी तसेच सेवाभावी संस्थांनी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन श्री. गणेश देशमुख यांनी केले आहे.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर