लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली १२५०० हून अधिक कुटुंबाना पनवेल भाजपतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
१२५०० हून अधिक कुटुंबाना पनवेल भाजपतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पनवेल(प्रतिनिधी) कोरोना व्हायरस आणि लॉक डाऊन परिस्थिती पाहता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल भाजपतर्फे १२५०० हुन अधिक गरीब, गरजूंना कुटुंबांना सामाजिक भावनेतून जीवनावश्यक वस्तूंचे मदत कार्य केले. पनवेलमध्ये असलेल्या सर्व झोपडपट्टी वसाहत, दुर्गम भाग, आदिवासी बांधव, रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सर्वसामान्य माणसाला दिलासा दिला.
कोरोना व लॉकडाऊनमुळे अनेकांना रोजगारापासून दूर रहावे लागत आहे अशा परिस्थितीत ते व त्यांचे कुटूंबिय उपाशी राहू नयेत यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गरीब गरजूंना तांदूळ, डाळ, तेल कांदे, बटाटे आदी जीवनावश्यक वस्तूंची मदतकार्य सुरु केले. पनवेल भाजपच्या माध्यमातून हे मदत कार्य पोहोचविण्यात आले. यामध्ये भाजपच्या लोकप्रतितिनिधींनीही तसेच काही उद्योजकांनी या पवित्र कामात आपणही योगदान दिले पाहिजे या सामाजिक भावनेनेतून आर्थिक योगदान दिले आहे.
Comments
Post a Comment