फॅंटास्टिक अनुभव तोडी मिल फँटसीचा!


 




फॅंटास्टिक अनुभव तोडी मिल फँटसीचा

पनवेल(प्रतिनिधी) आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 'तोडी मिल फँटसी' नाटकाचा प्रयोग शनिवारी पार पडला. भारतीय कला केंद्र प्रस्तुत, थिएटर फ्लेमिंगो आणि देसीरिफ इंडिया निर्मित तोडी मिल फँटसी हे म्युझिकल नाटक म्हणजे पनवेलकरांसाठी पर्वणीच ठरली. 

       हे नाटक घडतं ती जागा म्हणजे चक्क तोडी मिल सोशल रेस्टो आणि बारचं प्रशस्त बाथरूम! खरंतर बाथरूम मध्ये घडणारं नाटक ही कल्पनाच मुळात भन्नाट आहे. नाटक आधारित आहे मिल कामगारांचा आत्ताच्या पिढीला पडलेल्या प्रश्नांवर,ज्यांचे आई-बाप सुद्धा कामगार म्हणून जगले तेव्हा आपणही तेच चाकरीचं आयुष्य जगायच की स्वतःच्या बळावर बिझनेस करायचा या निर्णयाभोवती नाटक फिरतं.

           अत्यंत कल्पक आणि हटके विचार मांडणारा नाटकाचा लेखक सुजय सुरेश जाधव हा पनवेलचा राहणारा. त्याने आपल्या लेखणीतून मांडलेल्या फॅंटसीज, नाटकातील संवादांना मार्व्हल,गेम ऑफ थ्रोन्सचे दिलेले कंटेंपररी संदर्भ आणि सुपर कुल तरुणाईच्या भाषेचा दिलेला बाज यामुळे प्रेक्षकांकडून त्याने भरभरून दाद कमावली. कपिल रेडेकर, शुभंकर एकबोटे, जयदीप मराठे,प्रमिती नरके या तरुण कलाकारांचा सकस अभिनय व यासर्व कन्टेंटची उत्तम भट्टी जमवून आणणारा दिग्दर्शक विनायक कोळवणकर तसेच संपूर्ण व्यवस्थापन टीमचही विशेष कौतुक. नाविन्यपूर्ण अशा ह्या नाटकाच वैशिष्ट्य ठरल ते ह्याच संगीत. देसिरीफचा लाईव्ह म्युझिक बॅंड, सुजयने लिहिलेले आणि कलाकारांनी सादर केलेले रॅप्स यांनी नाटकाची रंगत वाढवली व पनवेलकरांची वाहवा मिळवली. आजच्या पिढीच्या ह्या हटके म्युझिकल नाटकाचा विलक्षण अनुभव एकदातरी नक्कीच घ्यायलाच हवा, अशी प्रतिक्रिया प्रेक्षक म्हणून उमेश पोद्दार व अभिजित आठवले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.












MailtrackSender notified by 
Mailtrack 16/04/19, 3:04:32 pm
 





 


 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर