जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातील कामगारांना भरघोस पगारवाढ आणि सुविधा
जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातील कामगारांना भरघोस पगारवाढ आणि सुविधा
पनवेल(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ धुतुम मध्ये ठेकेदारातर्फे काम करणाऱ्या हायवे रोडलाइन्स प्रायव्हेट लिमिटेडमधील कामगारांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून भरघोस पगारवाढीचा करार संपन्न झाला.
चार वर्षासाठी झालेल्या या करारानुसार प्रथम वर्षी २ हजार, द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षी प्रत्येकी १२०० रुपये असे एकूण ५६०० रुपयांची पगारवाढ तसेच गणवेश, साप्ताहिक सुट्टी, रजा, प्रवास भत्ता, शैक्षणिक भत्ता, कँन्टीन भत्ता, बोनस, कामगार विमा योजना, सार्वजनिक सुट्ट्या, भविष्य निर्वाह निधी, उत्सव अनुदान, ग्रॅज्युएटी आदी सुविधा या कामगारांना देण्यात येणार आहे.
सहाय्यक कामगार आयुक्त संभाजी व्हनालाकर यांच्या प्रमुख उपस्थितीत खांदा कॉलनी येथे झालेल्या या करारनाम्यावेळी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण, संघटक रवींद्र कोरडे, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ धुतुमचे उप व्यवस्थापक श्री. माने, संतोष तांडेल, हायवे रोडलाईनचे व्यवस्थापक प्रमोद श्राफ, व्यवस्थापक वसंत डोंगरे, कामगार प्रतिनिधी मंगेश केदारी, वैभव पाटील, राजेश शेळके, दीपक गावंड, मुकेश भोईर, ओमकार घरत, सुहास पाटील, शेखर म्हात्रे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment