कोरोनो संदर्भात अधिक कार्यक्षम व्यवस्था करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची सूचना
कोरोनो संदर्भात अधिक कार्यक्षम व्यवस्था करा
- आमदार प्रशांत ठाकूर यांची सूचना
पनवेल(प्रतिनिधी) कोरोनो व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक काळजी घेण्याची गरज लक्षात घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्यासोबत आज (दि.१५) बैठक घेऊन या संदर्भात महापालिकेच्या माध्यमातून अधिक कार्यक्षम व्यवस्था करण्याची सूचना केली.
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा ३२वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत देशात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पनवेल हद्दीतील संशयित तसेच बाधितांना योग्य तो उपचार मिळाला पाहिजे, यासाठी अधिक कार्यक्षमतेची योग्य व्यवस्था करावी अशी सूचना देऊन जनजागृतीवर अधिकाधिक भर देण्याचे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले. या बैठकीस महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment