डिजिटायझेशनकडे नेणाऱ्या प्रवासाच्या आघाडीवर आयपीएएस

देशभरातील राज्य सरकारांच्या नियोजन समित्या निधीचा वापर, प्रकल्प, प्रस्ताव आणि योजनांच्या अधिक चांगल्या व्यवस्थापनावर वेळोवेळी देखरेख करण्यासाठी कागदपत्रांशिवाय कामकाजाचा मार्ग अवलंबलत असून  डिजिटायझेशनकडे नेणाऱ्या प्रवासात  इंटिग्रेटेड प्लॅनिंग ऑफिस ऑटोमेशन सिस्टीमअर्थात आयपीएएस आघाडीवर आहे. 


  कालांतराने प्रचंड मोठ्या प्रमाणात माहिती जमा होऊन सरकारी संस्थांमध्ये फाइल्सचा ढीग जमा होतो. कागदपत्रांच्या अशा ढिगाऱ्यांमुळे व्यवस्थापनाचे आव्हान निर्माण होते. त्यातूनच निर्माण होणाऱ्या कामाला वेळेवर मंजुरी न मिळणे, योग्य पाठपुरावा तसेच कामाची देखरेख न केली जाणे, अशा समस्या उद्भवून कामाची प्रगती मंदावणे, कागदपत्रे गहाळ होणे, योग्य विश्लेषणाअभावी मानवी निधी व्यवस्थापन अवघड होणे इत्यादींमुळे हे चक्र सांभाळू शकणाऱ्या ऑटोमेशन सॉफ्टवेयरच्या अभावी प्रभावीपणे व कार्यक्षमपणे कामकाज हाताळले जाणे अशक्य होते.


    आयपीएएस – इंटिग्रेटेड प्लॅनिंग ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम ही सॉफ्टवेयरवर आधारित यंत्रणा आहे, ज्यामध्ये फाइल्सबाबत प्रतिसाद देण्याची वेळ कमी केली जाऊन सरकारी यंत्रणा डिजिटल तसेच स्वायत्त केली जाते. पर्यायने जिल्हास्तरीय विकास निधी हाताळण्यास मदत होते. आयपीएएसमुळे राज्यातील नियोजन समित्यांमध्ये पारदर्शकता येते, शिवाय कामकाजाचा खर्च कमी होतो आणि माहिती नष्टही होत नाही. नागरिकांना विविध प्रकल्प आणि सरकारी योजनांची वास्तविक प्रगती जाणून घेता येते.


    महाराष्ट्रासारख्या राज्याने याआधीच हे तंत्रज्ञान राबवले आहे. महाराष्ट्र राज्याची जिल्हा नियोजन समिती एप्रिल 2020 पासून पूर्णपणे कागदपत्रांशिवाय काम करणे अपेक्षित आहे. फाइल्सचा वेगवेगळी ठिकाणे आणि कार्यालयांत होणाऱ्या प्रवासामुळे होणारी दिरंगाई काढून टाकण्यासाठी आयपीएएस सज्ज झाले आहे. आयपीएएसमुळे खर्च कमी होतो आणि समित्यांना कामातील अचूकता कायम राखून ते वेळेवर पूर्ण करण्यात मदत होते. आयपीएएस नियोजन खात्याचे कामकाज पूर्णपणे कागदपत्रांशिवाय करणे शक्य करणार असून त्यांचे डिजिटल रुपांतर करून अधिक सफाईदार व पारदर्शक प्रक्रिया प्रत्यक्षात आणणार आहे.  जागा, कार्यक्षमता आणि पारदर्शकता यांच्यातील दरी कमी करणारे आयपीएएस हे भारताच्या डिजिटल रुपांतरणातील आवश्यक आणि महत्त्वाचे साधन आहे. लवकरच भारतभरातील राज्य सरकार ईएसडीएस सॉफ्टवेयर सोल्यशून प्रा. लि. द्वारे पुरवल्या जाणाऱ्या आयपीएएससारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचा प्रवास सुरू करतील.


 


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर