Posts

Raigad Mat

# लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी, थेट मिळणार 4500 रु. # महिला व बालविकास मंत्री आदितीजी वरदा सुनिल तटकरे यांच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण.

Image
  # लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी, थेट मिळणार 4500 रु.  # महिला व बालविकास मंत्री आदितीजी वरदा सुनिल तटकरे यांच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण. # लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाची सामाजिक योजना असून ती कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे. तांत्रिक कारणांमुळे ज्या महिलांचे पैसे अडकले आहेत, त्यांनी तात्काळ आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे श्रीवर्धन मतदार संघाच्या लाडक्या आमदार व महिला आणि बालकल्याण मंत्री आदितीजी तटकरे यांनी हातातील समय म्हणजे "घड्याळा"कडे बघत आपले मत "रायगड मत" कडे व्यक्त केले.  रायगड मत / जितेंद्र नटे    अनेक महिलांच्या संसाराला हातभार लावण्याचे पुण्याचे काम करणारी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राच्या लाडक्या महिला मंत्री आदितीजी तटकरे यांनी आणली. महिन्याला मिळणारे थोडेफार पैसे हे पैसे नसून महिलांच्या हक्काची मदत झाली आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील महिला या योजनेचे सारे श्रेय आपल्या लाडक्या मंत्री आदिती तटकरे यांना देतात. दिवस रात्र एक करून त्...

# उद्योगपती अभिषेक दाजी विचारे यांना पांगलोली जिल्हा परिषद गटातून जनतेचा जाहीर पाठिम्बा... # राष्ट्रवादी पक्षाने उतरवलेला अभिषेक विचारे नावाचा भक्कम खिलाडी म्हसळा पांगलोली गटातून जिल्हापरिषद जिंकणार

Image
# उद्योगपती अभिषेक दाजी विचारे यांना पांगलोली जिल्हा परिषद गटातून जनतेचा जाहीर पाठिम्बा... # राष्ट्रवादी पक्षाने उतरवलेला अभिषेक विचारे नावाचा भक्कम खिलाडी म्हसळा पांगलोली गटातून जिल्हापरिषद जिंकणार. म्हसळा - जितेंद्र नटे@रायगड मत raigadmat.page म्हसळा तालुक्यात सद्या "थंडी जरी गुलाबी पडत असली, तरी राजकीय गर्मी मात्र वाढली आहे." प्रत्येक पक्ष अगदी चोखून - चाचपून उमेद्वार मैदानात उतरवीत आहेत. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत येथे पाहायला मिळत आहे. यामध्ये राष्ट्रवादीकडून पांगलोली जिल्हा परिषद गटातून म्हसळ्याचे उद्योगपती फलसप गावचे स्थानिक भूमिपुत्र दाजी विचारे साहेब यांचे पुत्र अभिषेक दाजी विचारे यांना राष्ट्रवादीने तिकीट देऊन विजयाची जणू सलामीच दिली आहे.  विचारे यांचे सर्व समाजाप्रती चांगले व मोठे काम आहे. त्यामुळे म्हसळ्यातील मतदार त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहतील असा पक्षाला विश्वास आहे.  आमदार अदितीजी तटकरे यांचे गावागावत केलेली विकास कामे, सतत जनतेमध्ये ठेवलेला जनसंपर्क यामुळे राष्ट्रवादी पक्षाचीच सद्या जोरदार हवा आहे. खासदार सुनिलजी तटकरे साहेब आणि आमदार आदितीजी ...

ब्लु फ्लॅगमुळे श्रीवर्धन मतदार संघात रोजगार वाढीस चालना मिळतेय. # कोकणातील पाच समुद्र किनाऱ्यांच्या विकासासाठी २० कोटींचा निधी

Image
  कोकणातील पाच समुद्र किनाऱ्यांच्या विकासासाठी २० कोटींचा निधी श्रीवर्धनसह महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनाऱ्यांनी ‘ब्ल्यू फ्लॅग पायलट’ हा आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. समुद्र किनाऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी मिळालेले हे यश नक्कीच प्रेरणादायी आहे. भविष्यात किनाऱ्यांवर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील. ज्यामुळे पर्यटनाबरोबर स्थानिक रोजगाराला चालना मिळेल, अशी आशा आहे. - आदिती तटकरे, महिला व बालकल्याणमंत्री आमदार - श्रीवर्धन मतदार संघ ब्लू फ्लॅग पायलटचा दर्जा मिळाल्यानंतर त्या पाच समुद्रकिनाऱ्यांवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. त्यासाठी २० कोटींच्या प्रशासकीय खर्चाला राज्य शासनाने मान्यता दिली. अलिबाग : ब्लू फ्लॅग पायलटचा दर्जा मिळाल्यानंतर त्या पाच समुद्रकिनाऱ्यांवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. त्यासाठी २० कोटींच्या प्रशासकीय खर्चाला राज्य शासनाने मान्यता दिली. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील कामांसाठी १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागाव आणि श्र...
Image
  प्रा. तुषार उमासरे यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. – तालुक्याचा अभिमान म्हसळा (प्रतिनिधी शिरीष समेळ) ता २० /०९/२०२५ महाड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा ठरावा असे यश प्रा. तुषार सविता  शिवाजी उमासरे यांनी मिळवले आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठाची रसायनशास्त्र  विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.त्यांनी “_सिंथेसिस, कॅरेक्टराझेशन ऍड बायलोजिकल स्टडिज ऑफ सम मेटल कॉम्प्लेसेस विथ नाॅव्हेल शिफ बेसेस ऑफ  ऑसिनॅफ्थ्यॅक्किनोन”  या विषयावर सखोल संशोधन करून प्रबंध सादर केला. या संशोधनासाठी मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. संजय के पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या प्रबंधात त्यांनी “ संयुगांची निर्मिती”, “नवीन उत्प्रेरकांचा वापर”या विषयांचा अभ्यास करण्यात आलाआहे. प्रा. तुषार उमासरे हे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रहीवाशी त्यांचे पदवी पर्यंतचे शिक्षण डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ,महाड तर पदव्युत्तर शिक्षण दापोली येथील दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स काॅलेज येथे झाले असून,सध्या कोकण  उन्नती मित्र मंडळ संचलित आणि कै.ए.आर.अंतुले संस्थापित वसंतराव...

रायगड मत गणपती विशेषांक....

Image
 रायगड मत गणपती विशेषांक.... संपादक - जितेंद्र नटे 

उरण-नेरूळ रेल्वे प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा लवकरच फेऱ्या वाढणार...

Image
  उरण-नेरूळ रेल्वे प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा लवकरच फेऱ्या वाढणार... पनवेल (प्रतिनिधी) उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी रेल्वे प्रवाशांच्या दृष्टिकोनातून दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान उरण ते नेरूळ या महत्त्वपूर्ण रेल्वे मार्गाच्या संदर्भात केंद्रातील संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली. प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच सध्याच्या 40 फेऱ्यांऐवजी 50 फेऱ्या सुरू करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे त्या अनुषंगाने लवकरात लवकरच अंमलबजावणी होणार आहे . यामुळे उरण व नेरूळ परिसरातील प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक सुकर, सोयीस्कर आणि वेळेवर होणार आहे.      या बैठकीत केवळ रेल्वेमार्ग, फेऱ्या वाढविण्याबाबतच नव्हे, तर प्रवाशांना भेडसावणाऱ्या इतर प्रश्नांवरही सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. स्टेशनवरील सुविधा, वेळापत्रकातील नियमितता, तांत्रिक अडचणी आणि स्थानिक गरजांबाबत मांडणी करून त्यांचे निराकरण करण्यासाठी लवकरच ठोस पावले उचलली जाणार आहेत. उरण-नेरूळ परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी नेह...

# लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा' # अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती; सर्वोत्कृष्ट भजनी मंडळाला ५१ हजार रुपये बक्षिस

Image
  # लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा'  # अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती; सर्वोत्कृष्ट भजनी मंडळाला ५१ हजार रुपये बक्षिस पनवेल (प्रतिनिधी)  गोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे उदघाटन शनिवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी सकाळी ९. ३० वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे.          यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, पंडित शंकरराव...