Posts

मीरा-भाईंदरमध्ये गवळी समाज संघटनेचा तृतीय वर्धापनदिन उत्साहात.

Image
  मीरा-भाईंदरमध्ये गवळी समाज संघटनेचा तृतीय वर्धापनदिन उत्साहात. समाजात एकोप्यासह संस्कृतीचे दर्शन, आ. नरेंद्र मेहता यांची प्रमुख उपस्थिती. भाईंदर, (राजू रिकामे) मीरा-भाईंदर गवळी समाज संघटनेच्या तृतीय वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. या सोहळ्यात समाज बांधव व महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून एकतेचे दर्शन घडवले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीकृष्ण भगवान यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. गवळी समाजाच्या एकोपा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यात लहानग्यांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात मुलांनी गाणी, नृत्य, विविध कला सादर करत उपस्थितांचे मन जिंकले. गवळी समाजाच्या या महत्वपूर्ण सोहळ्याला मीरा-भाईंदर शहरातील आमदार नरेंद्र मेहता, शिवसेनेच्या शहर संघटक निशा नार्वेकर, १४६ विधानसभा अध्यक्ष सचिन मांजरेकर, १४६ विधानसभा महिला अध्यक्ष पूजा आमगावकर, भाजपा मागाठाणे विभाग प्रमुख व गवळी समाजसेवक मदन वाजे, समाजसेवक महेश म्हात्रे, उद्योजक प्रकाश खेडेकर, उद्योजक...

Feb Issue - Pharmachem Times

Image
 

पत्रकार सुरक्षा समिती आयोजित कोकण विभागीय पत्रकार अधिवेशन 28 फेब्रुवारीला पनवेलमध्ये

Image
  पत्रकार सुरक्षा समिती आयोजित कोकण विभागीय पत्रकार अधिवेशन 28 फेब्रुवारीला पनवेलमध्ये  पत्रकार आणि आजची आव्हाने विषयावर पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची प्रमुख उपस्थिती  संपूर्ण कोकण क्षेत्रातील मुंबई, ठाणे, पालघर, नवीमुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील पत्रकारांसाठी वर्षातून किमान एकदा तरी एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने पत्रकार सुरक्षा समिती रायगड नवीमुंबईच्या वतीने "कोकण विभागीय पत्रकार अधिवेशन 2025" चे आयोजन शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी पनवेल तालुक्यातील धामणी येथील जोशी फार्म येथे आयोजित कारण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक नेत्र विशारद पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, मुंबई मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष संदीप चव्हाण, दैनिक पुण्यनगरीचे संपादक शैलेंद्र शिर्के, दैनिक लोकसत्ताचे सहाय्यक संपादक विकास महाडिक आणि पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांची उपस्थिती लाभणार आहे.  लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून सर्वसामान्य जनता मोठी अपेक्षा ठेवून न्यायाच्या प्रतीक्षेत असते. आणि खऱ्या अर्थाने पत्...

खांदा कॉलनी मधील प्राचीन व सुप्रसिध्द खांदेश्वर शंकर मंदिर येथे "महाशिवरात्री उत्सव" मोठ्या उत्साहात उद्या होणार साजरा

Image
  खांदा कॉलनी मधील प्राचीन व सुप्रसिध्द खांदेश्वर शंकर मंदिर येथे "महाशिवरात्री उत्सव" मोठ्या उत्साहात उद्या होणार साजरा खांदा कॉलनी मधील प्राचीन व सुप्रसिध्द खांदेश्वर शंकर मंदिर येथे "महाशिवरात्री उत्सव" मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सदर उत्सवादरम्यान दर्शनासाठी खांदा कॉलनी व आसपासच्या परिसरातील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवत असतात. रात्री ठीक १२ वाजता आरती झाल्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले केले जात असून दरवर्षीप्रमाणे स्व. संजय भोपी प्रतिष्ठान(SBSC) यांच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी श्री भोलेनाथाचा प्रसाद म्हणून मसाला दूध चे वाटप करण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती.  आपला कृपाभिलाषी, कु. अभिषेक संजय भोपी  जिल्हा सरचिटणीस - भाजयुमो उत्तर रायगड  अध्यक्ष - संजय भोपी प्रतिष्ठान(SBSC)

कोकणकर यावर्षी मुंबई गोवा महामार्गावर शिमगा करणार...

Image
  कोकणकर यावर्षी मुंबई गोवा महामार्गावर शिमगा करणार... माणगाव दि. २३ फेब्रुवारी रोजी जनआक्रोश समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली व महामार्गाची परिस्थिती कोकणकरांच्या समोर मांडण्यात आली. मुंबई गोवा महामार्ग संदर्भात जनआक्रोश समितीच्यावतीने पळस्पे ते पोलादपूर महामार्गाची पाहणी करण्यात आली यामध्ये अनेक ठिकाणी शासनाने केलेल्या चुकांची खैर सामान्य जनतेकडून ऐकायला मिळाली. माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी दिलेल्या नवीन डेडलाईन नुसार हा महामार्ग गणेशोत्सव पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले परंतु जनआक्रोश समितीने केलेल्या पाहणी नुसार ही देखील दिलेली एक डेडलाईन आहे.  शासनाच्या वतीने सांगण्यात येत असलेला पळस्पे ते कासू हा पहिला टप्पा 98% पूर्ण झाला असून इतर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस आहे परंतु सदर करण्यात आलेला काम निकृष्ट दर्जाचा असून सहा महिन्यापूर्वी झालेला कामावर पुन्हा खड्डे पडलेले आपल्याला दिसत आहेत मार्गावर कोणत्याही प्रकारचे नियोजन नसून पाणी जाण्यासाठी ड्रेनेज लाईन त्यानंतर डिव्हायडर मध्ये वृक्षारोपण साईड पट्टी या गोष्टींचा अद्यापही अभाव दिसून ये...

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला

Image
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला . मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक अडथळे दूर करत काही महिन्यातच पूर्णत्वास येणार आहे. गुरुवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला. पनवेल तालुक्यातील पळस्पे फाटा येथून महामार्गाच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली दरम्यान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे पहिल्यांदाच पनवेल तालुक्यात आले होते. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, दीपक बेहेरे, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, प्रीतम म्हात्रे रुपेश नागवेकर,अमरीष मोकल, केळवणे विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, साई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्याधर मोकल, किसान मोर्चाचे अतुल बडगुजर यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते .पनवेल ते हातखंबा रत्न...